Jitendra Awhad: आई सोडून गेली, बाबा सोडून गेले; जितेंद्र आव्हाड यांचं भावनीक ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad

Jitendra Awhad: आई सोडून गेली, बाबा सोडून गेले; जितेंद्र आव्हाड यांचं भावनीक ट्विट

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या अनुषंगाने एक फेसबुक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी सरत्या वर्षातल्या निरोप देताना कटू आठवणींचा उल्लेख केला आहे. त्यांनी भावनीक होत ट्विट केलं आहे.

हेही वाचा: Koregaon Bhima: भिमा कोरेगाव येथे दंगे व्हावे अशी काही जणांची इच्छा; चंद्रकांत पाटलांचा रोख कोणाकडे

ट्विटमध्ये लिहिले त्याच्या जिवनातील नविसरता येणाऱ्या घटनांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, "1997 … आई सोडून गेली , 2017…बाबा सोडून गेले, 2022…पोलिसांनी राजकिय दबावा पोटी खोटी विनय भंगाची तक्रार केली, ही तीन वर्ष कायमची लक्ष्यात राहतील , जखम हृदया वर आहे, आता ह्या नंतर किती ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल काही संगता येत नाही. सत्य परेशान हो सक्ता हैं । पराजीत नही।"

हेही वाचा: विदर्भात पावसाचा अंदाज |Cold in Maharashtra|Weather Update|पाहा व्हिडीओ

जितेंद्र आव्हाड यांना यावर्षात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. गेल्या महिन्यात कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यामुळं आव्हाडांना प्रचंड टीकेला सामोरो जावे लागले होते. आणि त्यांच्यांवर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल झाला होता.

टॅग्स :NCPjitendra awhad