

तात्या लांडगे
सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आता महिन्यातून दोनदा रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी हे मेळावे होतील. यातून दहावी, बारावी, आयटीआय, पदवी, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जिल्ह्यात, जिल्ह्याबाहेरील नामांकित कंपन्या, आस्थापनांमध्ये रोजगार तथा नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी शुक्रवारी (ता. ३१) पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध नामांकित उद्योगांमधील ३७८ पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी १० उद्योग सहभागी होणार आहेत.
या रोजगार मेळाव्यात अमेझॉन वेअर हाऊस असोसिएट, हेल्पर, केमिस्ट, फिटर, इलेक्ट्रिशियन, सीएनसी ऑपरेटर, आयटीआय फिटर, आयटीआय इलेक्ट्रिशियन अशा संधी उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे (तीन प्रतीत) घेऊन त्या दिवशी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत महापालिकेसमोरील नॉर्थकोट मैदानाजवळील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. रोजगाराविना असलेल्या तरुणांसाठी राज्य शासनाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्याच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली आहे.
तरुणांनी हे ध्यानात घ्यावे...
अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत ०२१७-२९९२९५६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा अधिक माहितीसाठी HTTPS://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केल आहे.
तरूणांना निश्चितपणे नोकरीची संधी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे जिल्ह्यातील बेरोजगार तरूण-तरूणांसाठी आम्ही दरमहा दोनदा रोजगार मेळावे घेणार आहोत. शैक्षणिक कागदपत्रे घेऊन तरुणांनी आमच्या कार्यालयात यावे. शैक्षणिक पात्रता पुरेशी असल्यास मुलाखतीनंतर थेट त्यांना जॉब मिळतो. तरुणांनी सुरवातीलाच पगारीचा विचार न करता मिळेल तो जॉब स्वीकारावा, जेणेकरून याच अनुभवातून पुढे त्यांना चांगली संधी उपलब्ध होईल.
- संगीता खंदारे, सहायक आयुक्त, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.