- संजीव भागवत
मुंबई - राज्यातील अनुदानित, सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या परंतु त्यांचे आधार लिंक होऊ न शकलेल्या तब्बल ४ लाख २३ हजार ४०८ विद्यार्थ्यांची माहिती समग्र शिक्षण मोहिमेतून जाहीर केली आहे. या माहितीमुळे सुमारे ४० हजारांहून अधिक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.