Joshimath Land Subsidence : केवळ जोशीमठच नाही तर उत्तरकाशी आणि नैनितालमध्येही भूस्खलनाची भीती, कारण आलं समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Joshimath Sinking

Joshimath Sinking : केवळ जोशीमठच नाही तर उत्तरकाशी आणि नैनितालमध्येही भूस्खलनाची भीती, कारण आलं समोर

Joshimath Sinking : उत्तराखंडमधील जोशीमठ येथील नैसर्गिक दुर्घटनेमुळे लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. या घटनेकडे पाहता, तज्ज्ञांचे मत पाहिलं तर ही एकमेव घटना नाही. जोशीमठप्रमाणेच हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या शहरांमध्येही भूस्खलनाच्या घटना घडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पर्वत रांगेवर वसलेली अनेक शहरे अशा घटनांसाठी अत्यंत संवेदनशील ठरत आहेत.

हेही वाचा: Pravasi Bharatiya Divas 2023 : कोव्हिड नंतर साजरा होणार प्रवासी भारतीय दिवस; जाणून घ्या महत्व!

त्या ठिकाणचे भूगर्भशास्त्र समजून न घेता मानवी हस्तक्षेप वाढणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. अशीच परिस्थिती जोशीमठमध्येही पाहायला मिळत आहे. येथे जमीन सतत धसत चालली आहे. हे सर्व घडत आहे कारण सततच्या पावसामुळे आणि पुरामुळे येथील पाया कमकुवत झाला आहे आणि धूप वाढली आहे. त्याच वेळी, मानवी अॅक्टिविटी देखील या परिस्थितीत एक मोठे कारण आहे.

हेही वाचा: Pravasi Bhartiy Diwas : दक्षिण आफ्रिकेतून परतल्यावर गांधीजींकडे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व कसं आलं?

जोशी मठ व इतर ठिकाणी घडणाऱ्या या घटनांमागे मेन सेंट्रल थ्रस्ट (MCT-2) चे रीएक्टिव्हेशन हे शोकांतिकेचे मुख्य कारण आहे. हा एक भूवैज्ञानिक दोष आहे ज्यामध्ये भारतीय प्लेट हिमालयासह युरेशियन प्लेटच्या खाली ढकलले जात आहे. कुमाऊं विद्यापीठातील भूविज्ञानाचे प्राध्यापक डॉ. बहादूर कोटलिया यांनी सांगितले की,

हेही वाचा: Farali Ragda Patties : सोमवारच्या उपवासासाठी बनवा खास फराळी रगडा पॅटीस

'येथे MCT-2 झोन पुन्हा सक्रिय करण्यात आला आहे. त्यामुळे जोशीमठचे मैदान बुडत आहे. तो कधी होईल हे सांगता येत नाही. गेली दोन दशके आम्ही सरकारांना हा इशारा देत आहोत, पण त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. तुम्ही भूगर्भशास्त्राशी लढू शकत नाही. आपण निसर्गाशी लढू किंवा जिंकू शकत नाही. जे काही होत आहे ते केवळ जोशीमठपुरते मर्यादित राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा: Travel Tips : हिवाळ्याच्या सुट्यांमध्ये कुठे जायचा प्रश्न पडलाय? अंदमानमधल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

नैनिताल आणि उत्तरकाशीमध्येही अशीच दुर्घटना घडण्याची शक्यता आहे

जोशीमठप्रमाणे नैनितालमध्येही अनेक मोठी बांधकामे पर्यटकांमुळे होत आहेत. बिनदिक्कत बांधकामे केली जात आहेत तसेच इन्फ्राही वाढवली जात आहे. हे शहर कुमाऊंमधील हिमालयाच्या खालच्या भागात आहे. 2016 च्या अहवालानुसार, टाउनशिपचा अर्धा भाग भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या ढिगाऱ्यांनी व्यापलेला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात, डॉ. कोटलिया यांनी शहराची स्थिती जाणून घेण्यासाठी 2009 च्या बलिया नाला भूस्खलनाचे विश्लेषण केले.

हेही वाचा: Travel Tips : बॅक टू बॅक ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त पैसे खर्च होत आहेत? उपयोगी पडतील या टिप्स

भूस्खलनाची अनेक कारणे असू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. अहवालानुसार, 'उताराचा आकार विनाशाचे सर्वात मूलभूत कारण असू शकते. कारण इथली बरीचशी ठिकाणे अतिशय उंच उतारावर आहेत. त्याच वेळी, जमिनीच्या आत असलेल्या दगडांचा प्रकार देखील येथे खूप महत्वाचा आहे