

Merchant Navy Success Story
esakal
विरार: वसई तालुक्यातील जूचंद्र हे गाव कलाकारांचे गाव म्हणून जसे ओळखले जाते तसेच ते शिक्षणासाठी हि प्रसिद्ध आहे. यागावात अनेक डॉक्टर,वकील,इंजिनिअर,पत्रकार ,नाटककार तयार झाले आहेत. त्याच पावलावर पाऊल ठेवत जूचंद्र (चंद्रपाडा ) येथील केसर आणि केतल ह्या दोन भगिनींनी आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करत गगनभरारी मारली आहे. यापैकी केसर एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर तर केतल हि मर्चंट नेव्हीमध्ये डेक कॅडेट अधिकारी म्हणून रुजू झाली आहे.