Santosh Deshmukh Murder Case : एक सदस्य चौकशी समिती स्थापन; अध्यक्षपदी माजी न्यायाधीश ताहलियानी
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी माजी न्यायाधीश म. ल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली असून, गृह विभागाने यासंबंधी आदेश काढले आहेत.
मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. गृह विभागाने यासंबंधी आदेश काढला.