नाशिक - सध्या महाराष्ट्र पोलिस दलामध्ये बदल्यांचे सत्र सुरू आहे. आस्थापना विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील ३७० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात नव्याने सहा पोलिस निरीक्षक रुजू होणार आहेत.