नीरव मोदी याच्याकडील चित्रांचा लिलाव ठरल्याप्रमाणेच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 मार्च 2020

फरार आर्थिक गुन्हेगार घोषित झालेल्या नीरव मोदीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या मालमत्तेचा लिलाव करण्याची कारवाई सुरू आहे. लिलाव केली जाणारी लाखो रुपयांची पेंटिंग्ज नीरव मोदीच्या मालकीची नसून रोहिन ट्रस्टची आहेत, असा दावा त्याचा मुलगा रोहिन मोदी यांनी केला. लिलावापूर्वी आवश्‍यक असलेली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. चित्रांच्या लिलावाबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध करून हरकती मागवल्या होत्या.

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याच्याकडील चित्रांच्या लिलावाला मनाई करण्यास बुधवारी (ता. ४) मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे हा लिलाव नियोजित वेळेनुसार होईल.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप  

फरार आर्थिक गुन्हेगार घोषित झालेल्या नीरव मोदीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या मालमत्तेचा लिलाव करण्याची कारवाई सुरू आहे. लिलाव केली जाणारी लाखो रुपयांची पेंटिंग्ज नीरव मोदीच्या मालकीची नसून रोहिन ट्रस्टची आहेत, असा दावा त्याचा मुलगा रोहिन मोदी यांनी केला. लिलावापूर्वी आवश्‍यक असलेली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. चित्रांच्या लिलावाबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध करून हरकती मागवल्या होत्या. त्यामुळे ऐनवेळी लिलाव रोखण्याची मागणी करणे अयोग्य आहे, असा युक्तिवाद सिंग यांनी केला. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य करून याचिका फेटाळली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Just like the pictures auctioned by Nirav Modi