
पुणे : काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे राज्यात निवडणूक प्रचारासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ता. 17 व 18 ऑक्टोबरला ते सात मतदारसंघांत सभा घेणार आहेत.
पुणे : काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे राज्यात निवडणूक प्रचारासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ता. 17 व 18 ऑक्टोबरला ते सात मतदारसंघांत सभा घेणार आहेत.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातून शिंदे यांच्या प्रचार दौऱ्याला प्रारंभ होईल. गुरुवारी (ता. 17) दुपारी बारा वाजता ही प्रचारसभा होईल. तेथून ते लातूर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा अमित देशमुख यांच्या प्रचारासाठी दुपारी दोन वाजता सभा घेतील. लातूरहून विमानाने ते सोलापूरला रवाना होतील. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या व विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापूरात सायंकाळी चार वाजता ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रचारसभा होईल. त्यानंतर, ते पुण्यात येणार आहेत. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या पुणे कँन्टोन्मेट मतदारसंघात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांची सभा होईल.
ज्योतिरादित्य शिंदे शुक्रवारी (ता. 18) सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात दौरा करणार असून, सांगली मतदारसंघातील उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी त्या दिवशी दुपारी बारा वाजता ते प्रचारसभा घेतील. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्यासाठी शिंदे यांची दुपारी दीड वाजता सभा होणार असून, या दौऱ्यातील त्यांची शेवटची प्रचारसभा सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव मतदारसंघाचे उमेदवार डॉ. विश्वजीत कदम यांच्यासाठी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे.