Maharashtra Politics : मोठ्या राजकीय पक्षांना KCR घाम फोडणार; चंद्रशेखर राव यांना हवेत नऊ माजी आमदार!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ताकदीने उतरू, अशी घोषणा त्यांनी केली.
K Chandrashekar Rao
K Chandrashekar Raoesakal
Summary

प्रमुख राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांकडून उमेदवारी मिळाली नाही; तर अपक्ष लढण्यापेक्षा नवा पर्याय म्हणून भारत राष्ट्र समितीकडे पाहता येईल, असेही काहींनी स्पष्ट केले.

सांगली : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक (Maharashtra Assembly Election) मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यातून विधानसभेसाठी आठ आणि लोकसभेसाठी एक अशा नऊ माजी आमदारांची त्यांना गरज आहे.

त्यासाठी बहुतांश माजी आमदार आणि विधानसभा लढण्याची क्षमता असलेल्या नेत्यांना हैदराबाद भेटीचे निमंत्रण देण्यात आले आहे. तेलंगणालगतचे राज्य असल्याने चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात अधिक लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच त्यांच्या नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे सभा झाल्या.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ताकदीने उतरू, अशी घोषणा त्यांनी केली. त्यानंतर लागलीच राज्यभर श्री. राव यांचे बॅनर लागले आहेत. सांगली शहर जिल्ह्यात किमान शंभर ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. हिंदी आणि मराठीतून तेलंगणाच्या विकासाच्या जाहिराती झळकत आहेत.

K Chandrashekar Rao
Eknath Shinde : 'त्या' जाहिरातीवरुन वाद पेटणार? CM शिंदे म्हणाले, फडणवीस आणि आमच्यात कोणतेही मतभेद..

या पार्श्‍वभूमीवर आता लोकसभा आणि विधानसभा लढवण्यासाठी उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. त्यात प्राधान्याने विधानसभा लढवलेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवारांना गळ घालण्यात आली आहे. त्यांच्यासमोर प्राथमिक प्रस्ताव ठेवण्यात आला असून, सविस्तर चर्चा करण्यासाठी त्यांना तेलंगणाची राजधानी हैदराबाद भेटीचे निमंत्रण देण्यात आले आहे.

K Chandrashekar Rao
Kolhapur Airport : CM शिंदेंच्या भेटीसाठी 'हा' माजी मंत्री विमानतळाबाहेर तासभर ताटकळत उभा राहिला!

जिल्ह्यातील काही माजी आमदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर त्यांना संपर्क साधण्यात आल्याचे सांगितले. भारत राष्ट्र समिती हा नवीन पक्ष आहे, त्यांची जाहिरातबाजी जोरदार असली तरी तो रुजेल का, वाढेल का, काय स्थिती राहील, याबाबत काहीच अंदाज नसल्याने तो प्रस्ताव ऐकून घेतला आहे, असेही काहींनी स्पष्ट केले. प्रमुख राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांकडून उमेदवारी मिळाली नाही; तर अपक्ष लढण्यापेक्षा नवा पर्याय म्हणून भारत राष्ट्र समितीकडे पाहता येईल, असेही काहींनी स्पष्ट केले. त्यामुळे राव यांच्या ‘एंट्री’ने इच्‍छुकांना नवा पर्याय मिळाल्याचे मानले जात आहे.

K Chandrashekar Rao
Karnataka : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 'हे' 36 काँग्रेस नेते अडचणीत; कोर्टानं बजावलं समन्स

शेतकरी केंद्रस्थानी, ग्रामीण मतदारांवर लक्ष

के. चंद्रशेखर राव यांनी शहरी मतदारांप्रमाणेच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून रचना केली आहे. ‘अब की बार, किसान की सरकार’, असा नारा त्यांनी दिला आहे. सांगली जिल्ह्याचा बहुतांश भाग ग्रामीण आणि शेतकरी प्रभावित आहे. त्यामुळे राव यांच्या ‘थिंक टँक’ला येथे प्रभाव पडण्याची अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com