Kailas Patil: शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर कैलास पाटील यांच उपोषण मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kailas Patil

Kailas Patil: शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर कैलास पाटील यांच उपोषण मागे

उस्मानाबादमधील ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांना पीकविमा आणि अनुदान मिळावं, यासाठी आमरण उपोषणाला पुकारलं होतं. दरम्यान गेल्या 7 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी देखील प्रतिसाद दिला होता. आज उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे कैलास पाटील यांच्या भेटीला आले होते. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा फोनवरून चर्चा केली त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.

कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही फोनवरून चर्चा केली आहे. याबाबत कैलास पाटील बोलताना म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता त्यांना पैसे मिळाले पाहिजेत. मला विश्वास आहे की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शब्द दिला आहे तो ते पाळतील. मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, नाहीतर थोडे दिवस वाट बघून निर्णय घेऊ असंही ते म्हणालेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 2020 मधील पीक विमा, अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या मागणीसाठी आमदार कैलास पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस होता. वीमा कंपनीकडून उस्मानाबाद जिल्ह्याला 1200 कोटी रुपये येणे असून, या प्रमुख मागणीसाठी कैलास पाटील यांचे उपोषण सुरु केले होते.

कैलास पाटील यांच्या उपोषणाला अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी देखील पाठींबा दिला होता. तर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील पाटील यांची भेट घेतली. तर विमा कंपनीशी बैठक घेऊ, तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पैसे लवकरात लवकर देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे.

टॅग्स :kailas patil