कालीदास कोळंबकर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी

टीम ई-सकाळ
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

- विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालीदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली.

मुंबई : विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालीदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीवर आज शिक्कामोर्तब झाले. कोळंबकर येत्या काही तासांत राजभवनात जाऊन अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्रातील राजकारणात आज पुन्हा एकदा राजकीय भूंकप झाल्याचे पाहिला मिळाले. अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.  

त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालीदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड केली आहे. आता त्यांचा शपथविधी राजभवनात होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalidas Kolambkar elected as acting Assembly President Maharashtra