

Maharashtra Flood News
esakal
कंधार: पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच दोन दिवसांपासून शहर व परिसरात झालेल्या दमदार पावसाने पिकांना जीवनदान मिळाले. मात्र, याच पावसामुळे कंधार-नरसी मार्गावरील कमी उंचीच्या पुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पहिल्याच पावसात या मार्गावरील पुलांवरून पाणी वाहू लागल्याने दळणवळण व्यवस्था प्रभावित झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.