गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात असलेले मराठी फलक हटवण्याची मागणी करण्यासह व्यापारी व इतर लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.
बेळगाव : अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial) अनावरण कार्यक्रमावेळी जय महाराष्ट्राचा जयघोष झाल्यामुळे कन्नड संघटनांमध्ये (Kannada Organization) पोटशूळ निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा दिल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कन्नड संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.