Maharashtra News: कराचीतून राज्यातील संस्थांना फंड; छत्रपती संभाजीनगर, बीड, बार्शी, नागपुरातील मदरशांचा समावेश

Investigation Into Foreign Funding: कराचीस्थित दावत-ए-इस्लामी संस्थेच्या मुंबई शाखेतून महाराष्ट्रातील पाच संस्थांना निधी आल्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
Maharashtra News

Maharashtra News

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर / बीड,: कराची (पाकिस्तान) येथील दावत-ए-इस्लामी संस्थेच्या मुंबई येथील शाखेतून राज्यातील नागपूर, बीड, बार्शी, खुलताबाद आणि छत्रपती संभाजीनगर येथील संस्थांना फंड आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील संस्थेला २५ लाखांची देणगी आली. पात्रुडच्या संस्थेतून संभाजीनगर आणि खुलताबाद येथील संस्थेशी व्यवहार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या संस्थेशी संबंधित लोकांच्या मोबाइलमध्ये पाकिस्तानशी संबंधित काही संपर्क आणि व्हॉट्सअॅप चॅट्स देखील आढळले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com