
जामखेड शहरालगत असलेल्या जांबवाडी परिसरात बोलेरो जीप रस्त्यालगतच्या विहीरीत पडून झालेल्या अपघातात,जीपमधील चौघांचाही दुर्दैवी मृत्यु झाला आहे.ही दुर्घटना बुधवारी (ता.१५) सायंकाळी सहा वाजता घडली.
जामखेड - जांबवाडी- मातकुळी रस्त्यावरून येणारी बोलेरो जीप (क्रमांक एम एच २३, ए यु ८४८५) ही रस्त्यालगत जांबवडी येथील गट क्रमांक ३९१ मध्ये असलेल्या विहिरीत पडून या जीपमधील सर्व चार व्यक्तींचा दुर्देवी मृत्यू झाला.