Karnataka-Maharashtra Dispute : बेळगावला येऊ नका! CM बोम्मईंचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

karnataka cm bommai warning to the ministers of maharashtra cm eknath shinde Dont come to belgaon

Karnataka-Maharashtra Dispute : बेळगावला येऊ नका! CM बोम्मईंचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना इशारा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा मुद्दा चांगलचा तापलेला आहे. दोन्ही राज्यातील नेत्यांकडून याबद्दल वेगवेगळी वक्तव्य करण्यात येत आहेत. यादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावला येऊ नये असे म्हटले आहे. यामुळे सीमावाद चिघळण्याची शक्यता आहे.

बेळगाव जिल्ह्यातील रामदूर्ग तालूक्यातील एका गावात विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले की, सध्याची कर्नाटक-महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बेळगावला येऊ नये असा सल्ला दिला आहे. कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी याबद्दलचा सचिव महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना दिला आहे.

बोम्मई यांनी सीमेपलीकडील जनता देखील आपलीच आहे, त्याठीकाणच्या कन्नड शाळांचा विकास होत नाही. शाळांना मुलभूत सुविधा मिळत नाहीत. कोणत्याही राज्यातील कन्नड शाळांना कर्नाटक सरकार अनुदान देणार आहे. कन्नड रक्षण प्रधिकरणाच्या माध्यमातून सीमेपलीकडील कन्नड शाळांना अनुदान देण्यात येणार आहे. सीमेच्या आतील आणि सीमेपलीकडील शाळांसाठी अनुदान १०० कोटींचे अनुदानाची तरतूद करण्यात येईल. तसेच सोलापूरमध्ये कन्नड भवन बांधण्यासाठी १० कोटी मंजूर केले आहेत असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच सीमेलगतच्या अनेक गावांनी कर्नाटकमध्ये समील होण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर हा वाद पुन्हा पेटला आहे. दरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे या वादाला खतपाणी मिळताना दिसत आहे.

टॅग्स :Karnataka