esakal | कार्तिक भटच्या तक्रारीनंतर परमबीर सिंग यांची सुनावणी पुढे ढकलली
sakal

बोलून बातमी शोधा

कार्तिक भटच्या तक्रारीनंतर परमबीर सिंग यांची सुनावणी पुढे ढकलली

कार्तिक भटच्या तक्रारीनंतर परमबीर सिंग यांची सुनावणी पुढे ढकलली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : चेंबूर पोलिस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शालिनी शर्मा (Shalini Sharma) यांनी सचिन वाझे (Sachin Waze) यांनाही मागे सोडत खंडणी वसुलीत आघाडी घेतली होती. त्यांना तत्कालीन पोलिस महासंचालकांचे अभय होते. शालिनी शर्मा यांनी गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन दोनशे कोटी मागितल्या आरोप कार्तिक भट नामक बांधकाम व्यावसायिकाने केली आहे. (Karthik-Bhatt's-entry-gives-a-new-twist-to-the-Parambir-Singh-case)

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोप प्रकरणात राज्याचे माजी पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार होती. परंतु, शालिनी शर्मा यांनी परमबीर सिंग यांच्या नावाने धमकावून दोनशे कोटींची खंडणी मागितली होती, अशी तक्रार कार्तिक भट या बांधकाम व्यावसायिकाने केली. मुंबई उच्च न्यायालयात तशी अंतरिम याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता या याचिकेवर १४ जूनला सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

हेही वाचा: यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून दोन ठार; दुसऱ्या दिवशीही मुसळधार

राज्य सरकारने उच्च न्यायालयात ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात ९ जूनपर्यंत परमबीर सिंग यांना अटक करणार नसल्याची हमी दिली होती. ती मुदत बुधवारीच संपली. परमबीर सिंग यांच्याविरोधात ॲट्रोसिटिचा गुन्हा पोलिस निरीक्षक घाडगे यांनी दाखल केला आहे. परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना घाडगे तेथे पोलिस निरीक्षक होते. परमबीर सिंग यांचे चुकीचे आदेश न ऐकल्याने त्यांनी कुभांड रचल्याची तक्रार, अकोल्यातील पोलिस अधिकारी भीमराव घाडगे यांनी केली.

(Karthik-Bhatt's-entry-gives-a-new-twist-to-the-Parambir-Singh-case)