Kartiki Ekadashi : शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं; फडणवीसांचं विठुरायाला साकडं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis Kartiki Ekadashi
Kartiki Ekadashi : शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं; फडणवीसांचं विठुरायाला साकडं

Kartiki Ekadashi : शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं; फडणवीसांचं विठुरायाला साकडं

विठ्ठल हा सामान्य माणसांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा देव आहे. त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस यावेत, त्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं, यासाठी काम करण्याची शक्ती आम्हाला मिळो अशी प्रार्थना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कार्तिकी एकादशीनिमित्त त्यांनी आज विठ्ठलाची शासकीय महापूजा केली.

आज कार्तिकी एकादशी आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. या महापूजेचा मान यंदा औरंगाबादमधल्या फुलंब्री तालुक्यातल्या शिरोड इथले रहिवासी असलेल्या उत्तमराव आणि कलावती साळुंखे या दाम्पत्याला मिळाला. पूजेनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.

शासकीय महापूजा झाल्यानंतर फडणवीसांनी पंढरपूर ते घुमान सायकल वारीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. संत नामदेव महाराजांनी जगाला दिलेल्या समता, बंधुता या संदेशाला उजाळा देण्यासाठी या सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही वारी २००० किलोमीटर प्रवास करणार असून, ही वारी महाराष्ट्र आणि उत्तर भारतातलं स्नेह वाढवणारी ठरेल, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आज पहाटे या सायकल वारीला सुरुवात झाली.