धनंजय-करुणा मुंडेंच्या प्रेमकथेचे रहस्य उलगडणार, सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनंजय मुंडे

धनंजय-करुणा मुंडेंच्या प्रेमकथेचे रहस्य उलगडणार, सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता. यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर खुलासा करताना धनंजय मुंडे यांनी संबंधित महिलेची बहीण करुणा हिच्याशी आपण सहमतीने परस्पर संबंधात होतो. यातून दोन मुलेही झाली आहेत व त्यांचे पालकत्व स्वीकारल्याची कबुली दिली होती. मात्र सध्या करुणा मुंडे (Karuna Dhananjay Munde) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलेल्या पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत.(Karuna Dhananjay Munde Share Post Her UpComing Love Story Book)

धनंजय मुंडे यांच्या या दुसऱ्या पत्नीने पोस्टमध्ये म्हटले आहे, प्रेमकथेचे रहस्य पुस्तकातून लवकरच उलगडणार आहे. या पुस्तकात नेमके काय असेल यावर सोशल मीडिया चर्चा सुरु झाली आहे. करुणा मुंडे पोस्टमध्ये म्हणतात, की माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर असून त्याचे प्रकाशन लवकरच केले जाणार आहे. दरम्यान अत्याचाराचा आरोप करणाऱ्या महिलेने नंतर मुंडे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेतली होती. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

Web Title: Karuna Dhananjay Munde Share Post Her Upcoming Love Story

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..