Pune Byelection Result : उद्याचा निकाल ठरवणार शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य? जाणून घ्या 3 महत्वाचे मुद्दे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Chinchwad By-Election Result will decide cm eknath shinde bjp devendra fadnavis govt fate politics

Pune Byelection Result : उद्याचा निकाल ठरवणार शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य? जाणून घ्या 3 महत्वाचे मुद्दे

कसबा चिंचवड पोटनिवडणूक.. अगदी उमेदवारी जाहीर करण्यापासूनच ही निवडणूक प्रतिष्ठेची झालीय... ही एकमेक पोटनिवडणूक असेल ज्यात सगळेच बडे नेते मैदानात दिसून आले. आता या निवडणुकीचा निकाल काही तासांवर येऊन ठेपला आहे. मात्र निवडणूक निकाला आधीच शहरात विविध ठिकाणी उमेदवारांना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आमदार म्हणून जाहीर केले आहे..

तसे बॅनर विविध ठिकाणी पाहायला मिळत आहेत...हा झाला एक भाग... मात्र कार्यकर्त्यापेक्षाही ही निवडणूक नेत्यासाठी महत्वाची आहे... त्यातही शिंदे फडणवीस सरकारसाठी... कसबा चिंचवड पोटनिवडणूक खरंच शिंदे फडणवीस सरकारचं भवितव्य ठरवणार का? जाणून घेवूयात पुढील काही मिनिटांत..

कसबा चिंचवड पोटनिवडणूक चांगलीच रंजक झालीय...सगळेच बडे नेते या निवडणुकीसाठी पुण्यात तळ ठोकून होते...कसब्यात भाजपचे हेमंत रासने विरुद्ध मविआचे रविंद्र धंगेकर यांच्यात लढत आहे.. तर तिकडे चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, मविआचे नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे अशी तिहेरी लढत आहे.. मात्र ही निवडणूक शिंदे फडणवीस सरकारसाठी महत्वाची मानली जात आहे... तीन मुद्दे यात प्रामुख्याने येतात..

१) जनमत चाचणी -

शिंदे फडणवीस सरकार स्थापन होवून ८ महिन्याहुन अधिकच काळ उलटला आहे.. याच काळात पदवीधर निवडणुकाही पार पडल्या आहेत आणि पदवीधरमध्ये शिंदे फडणवीस सरकारला मोठा फटका बसला...

अमरावती, नागपूर सारख्या बालेकिल्ल्यातच शिंदे फडणवीसांना पराभवाचा सामना करावा लागला...त्यामुळे पदवीधरमध्ये जनमत दिसून आलं तेच या पोटनिवडणुकीत घडू नये…यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यत्र्यांनी जोर लावला. मात्र या पोटनिवडणुकीच्या निकालावरुन बऱ्याच बाबी स्पष्ट होतील. त्यामुळे शिंदे फडणवीसांसाठी ही निवडणूक जनमत चाचणीच्या अनुषंगानेही महत्वाची आहे, कारण इथूनच पुढचं रणनीती बदलू शकते…

२) आगामी निवडणूक -

कसबा चिंचवड पोटनिवडणुकीत जिंकणे शिंदे फडणवीसांसाठी अतिशय महत्वाची आहे.. कारण याच निवडणुकीवरुन पुढच्या निवडणुकीचं गणित ठरणार आहे. खरं तर मुंबई महापालिका निवडणूक कधीही जाहीर होवू शकतात आणि शिंदे फडणवीसांचा मिशन मुंबई महापालिकेसाठी जोरदार तयारी सुरु आहे. अगदी पंतप्रधान मोदींपासून सगळे बडे नेते मुंबईवर बारीक लक्ष ठेवून आहेत. शिवाय नुकतचं गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौरा केला…

याच दौऱ्यात त्यांनी आगामी लोकसभेचं रणसिंग फुकलंय..इतकचं नाही तर गृहमंत्री अमित शाह यांनी कसबा निवडणुक काळात पुण्यात होत.. त्यामुळे शाहंच पुण्यात असणं..शिंदे फडणवीसांसाठी कसबा चिंचवड पोटनिवडणूक किती महत्वाची हे दिसून येतं म्हणूनच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ही पोटनिवडणूक शिंदे फडणवीसांसाठी महत्वाचीय..

३) पक्ष संघटनेवर होणारा परिणाम -

आधीच सांगितल्या प्रमाणे जनमत चाचणीत बलाबल दिसलं नाही तर भाजप आणि शिवसेनेला ही पोटनिवडणूक महागात पडू शकते…पदवीधरच्या निकालामुळे शिंदे फडणवीसांच्या शिलेदारांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा आहे. त्याचा परिणाम पक्ष संघटनेवर होतो. गावपातळीचा विचार केला तर कार्यकर्त्यांमध्ये उदासिनता येते. त्यामुळे कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचा थेट परिणाम भाजप आणि शिवसेनेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे हे मुद्दे पाहिलेत तर कसबा चिंचवड निवडणूक जिंकणे शिंदे फडणवीसांसाठी अत्यंत महत्वाचे आहे...आता निकाल काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे निकालाअंतीच सगळं चित्र स्पष्ट होईल...तोपर्यंत वेट अॅन वॉच... कसबा चिंचवडमध्ये कोण बाजी मारणार..