KDCC Bank Elections Result : सत्ताधाऱ्यांचा एकतर्फी विजय

समविचारी आघाडीने 3 जागा काबिज केल्या.
KDCC Bank Elections Result 2022
KDCC Bank Elections Result 2022Eskal

कोल्हापूर: राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कोल्हापूर जिल्हामध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (केडीसीसी) निवडणूकीत (KDCC Bank Elections Result)सत्तारूढ आघाडीने 21 पैकी 18 जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला आहे. तर दिग्गिज नेत्यांना टक्कर देत शिवसेनाप्रणित (Shivsena) समविचारी आघाडीने 3 जागा काबिज केल्या आहेत. सत्तारूढ गटाच्या सहा जागांच्या उमेदवारांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आबिटकर (Prakashrao Abitkar) यांचा भाऊ प्रा. अर्जुन आबिटकर यांनी आमदार प्रकाश आवाडे (Prakasha Aawade) यांना पराभवाचा धक्का देत बॅंकेत संचालक म्हणून प्रवेश केला.

  • पहिल्या सत्रात मतपत्रिका गटनिहाय वेगळा केल्या जात आहेत.

  • जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला सुरुवात होताच मतपेटीत पन्नास रुपये ओवाळणी म्हणून दिले आहेत.

  • बँकेत सगळेच चोर प्रशासक नेमा मतदारांनी चिठ्ठीतून व्यक्त केली खंत.

  • मतदान केंद्रावर मंडलिक-पाटलांनी लावली हजेरी.

  • रणवीर गायकवाड ६६ मते घेऊन निवडून आले. सर्जेराव पाटील ३२ मते. शाहूवाडी सेवा संस्था गट.

  • शिरोळात राजेंद्र पाटील-यड्रावकरच ‘किंग’;गणपतराव पाटील यांचा पराभव

  • कृषी पणन गटातून बाबासाहेब पाटील आसुर्ले कर व संजय मंडलिक विजयी.

  • संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, रणवीर, सुधीर देसाई यांची विजयी सलामी

  • विरोधकांनी खाते उघडले : मंडलिक, आसुर्लेकरांचा विजय

  • पन्हाळ्याचा गड कोरेंनी राखला ; २४३ पैकी २०३ मते

  • आबिटकर विजयी, आवाडेंचा ‘करेक्ट कार्यक्रम’;पपतसंस्था गटाचा निकाल ः हसन मुश्रीफांना शह

  • इतर संस्था गटात भैय्या मानेंचा ‘डंका’;सत्तारूढ गटाला बळ ः विरोधी पॅनेलचे क्रांतिसिंह पवार पराभूत

  • दोन्ही उमेदवार शिवसेनेचेच: यड्रावकर, रणवीर गायकवाड आमच्यासोबतच;मंडलिक यांचा दावा

  • विमुक्त जाती भटक्या जमाती गटातील निकाल असा

    स्मिता युवराज गवळी - ४८८७

    विश्वास शंकरराव जाधव - २४९५

  • शाहूवाडीतून रणवीर यांचा दणदणीत विजय

  • महिला गटातून सत्तारूढ आघाडीच्‍या निवेदीता माने, श्रुतिका काटकर विजयी

  • वडिलांच्या पराभवाची व्याजासह परतफेड; रणवीरसिंग गायकवाडांचा दणदणीत विजय

  • कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणूक निकाल

    विकास सेवा संस्था गट

    आजरा- सुधीर देसाई

    भुदरगड -रणजितसिंह पाटील

    गडहिंग्लज- संतोष पाटील

    पन्हाळा- आमदार विनय कोरे

    शाहुवाडी- अपक्ष रणवीरसिंह गायकवाड

    शिरोळ- डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

  • इतर मागासवर्गीय गट

    विजयसिंह माने

  • इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गट

    प्रताप उर्फ भैय्या माने

  • अनुसुचित जाती गट

    आमदार राजू आवळे

  • भटक्या विमुक्त जाती जमाती

    स्मिता गवळी

  • महिला प्रतिनिधी गट

    निवेदीता माने

    श्रुतिका काटकर

  • प्रक्रिया गट

    संजय मंडलिक

    बाबासाहेब पाटील

  • नागरी बॅंक पतसंस्था गट

    अर्जुन आबिटकर

  • 18 जागा जिंकून सत्तारूढचा एकतर्फी विजय; शिवसेनेचा 3 जागांवर कब्जा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com