'ग्रामविकास मंत्रालयाचे 1,500 कोटींचे टेंडर मुश्रीफांच्या घरातच'

Kirit-Somaiya
Kirit-Somaiyasakal media

कोल्हापूर : हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) मला माझी लायकी दाखवण्याचा प्रयत्न केला. मी मुंबईतून फायनान्स मध्ये पीएचडी केलेली आहे. मी आरोप करत नाही पुरावे दिले आहेत. बेनामी अॅक्ट प्रमाणे इन्कम टॅक्स कारवाई करत आहे. चौकशी सुरू झालेली आहे. ग्रामविकास मंत्रालयाचे १,५०० कोटींचे टेंडर मुश्रीफांनी आपल्या कुटुंबाला दिले. असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी पत्रकार परीषदेत केला आहे.

ते म्हणाले, मश्रीफांच्या मुलाच्या खात्यात जी कंपनी बंद झाली अशा कंपनीच्या नावाने बँक अकाउंट उघडले गेले आहे. त्याचे पैसेही त्यांच्या मुलाच्या हातात आले. याशिवाय त्यांनी स्वतःच्या ग्रामविकास खात्याचे टेंडर स्वतःच्याच जावयाच्या कंपनीला दिले आहे. जी कंपनी अस्तित्वातच नाही त्या कंपनीतून पैसे आले कसे असा सवाल उपस्थित केला.

कोव्हिडमध्ये ठाकरे सरकारने भ्रष्टाचार केला. मी चौदा मंत्र्याचे घोटाळे उघड केले आहेत. त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. अशावेळी अनेकजण रुग्णालयात जाऊन आजारी पडत आहेत. तर काहीजण पळून जात आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला.

पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत करुन दाखवलं. तर ठाकरे सरकारने भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राची सुरुवात केलीय. ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी कोविड सोईसुविधांचा व्यवसाय सुरु केला. सरकारमधील अनेक नेते गायब आहेत . मी केलेले सर्व घोटाळे खरे आहेत. दिलेले सगळे पुरावे खरे आहेत.

Kirit-Somaiya
सोमय्यांनी दिली मुश्रीफांविरोधात तक्रार; आता राज्यपालांना ही भेटणार

किरीट सोमय्यांचा फक्त माझा रिसॉर्ट दिसतो. पण केंद्रीय मंत्र्यांचे रिसॉर्ट दिसत नाही . मात्र हा मुद्दा पर्यटन मंत्र्यांना दिसत नाही. ज्यांनी माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला. गवळी यांचे सहकारी सहीद खानला अटक करण्यात आली आहे. अजून एक चौथा घोटाळा बाहेर काढणार असे ही सोमय्यां म्हणाले.

सोमय्या यांनी काय केलेत आरोप

अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात स्वतःच्या जावयादकडून 97 टक्‍के पैसा हा भ्रष्टाचाराचा आहे. फसवणुकीचा काळा पैसा हा शेल कंपन्यांद्वारा आणला गेला आहे. स्ट्राइक ऑफ कंपनीच्या नावाने बँक खाते उघडणे, बँकेचे व्यवहार करणे हा भारतीय सहिताच्या अंतर्गत फसवणूक, फोर्जरी, फ्रॉड असल्‍याचेही तक्रारीत म्‍हटले आहे. ज्या कंपन्या बंद झाल्या आहेत त्यांची फोर्जरी करून फसवणुकीने बँक व्यवहार केले. याद्वारा भ्रष्टाचाराचा कोट्यवधी रुपयांचा पैसा अशा बंद कंपन्यामध्ये वळवून स्वतःच्या परिवाराच्या खात्यामध्ये वळवला. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com