Kirit Somaiya : 'देशमुखांच्या बाजूची कोठडी सॅनिटाइज करायला सांगा'

प्रवीण राऊत ईडीला माहिती देतील याची संजय राऊत यांना भीती
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSakal

पुणे: किरीट सोमय्यांनी आज पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. यावेळी सोमय्यां यांचे महानगरपालिकेच्या पायरीवरच सत्कार करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसने त्याच पायऱ्यांचे गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून शुद्धीकरण केले. या प्रकारानंतर सोमय्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आर्थर रोड मधील अनिल देशमुख ज्या कोठडीत आहेत त्याच्या बाजूची कोठडी सॅनिटाइज आणि स्वच्छ करायला सांगा तेथे अनिल परब (Anil Parab) आणि संजय राऊत (Sanjay Raut)यांना पाठवायचं आहे असा टोला पत्रकार परिषदेत सोमयांनी( Kirit Somaiya)मारला.

ते म्हणाले, राऊत यांचा एक पार्टनर प्रवीण राऊत जेलमध्ये आहेत. जर सुजित पाटकर जेलमध्ये गेले तर राऊत यांचं काय होणार? असा सवालही सोमय्या यांनी केला. संजय राऊत यांना प्रवीण राऊत ईडीला माहिती देतील याची भीती वाटत आहे असेही सोमय्या म्हणाले.

Summary

संजय राऊत यांना प्रवीण राऊत ईडीला माहिती देतील याची भीती वाटत आहे असेही सोमय्या म्हणाले.

Kirit Somaiya
किरीट सोम्मयांच्या वादात काँग्रेसची उडी; गोमूत्र टाकून पायऱ्यांचं शुद्धीकरण

किरीट सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी याच पायऱ्यांवर माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीनं ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट दिले होते असा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरें यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांचे नाव सांगावे. त्यांचा मालक केएम हॉस्पिटलचा मालक आहे. उद्धव ठाकरेंनी पुण्यातल्याच लोकांच्या जीवाशी खेळले आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची बेनामी संपत्तीवर कारवाई केल्याशिवाय हा सोमय्या गप्प बसणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com