भावना गवळींकडे 7 कोटी आले कुठून? ED कारवाईनंतर सोमय्यांचा हल्लाबोल

किरीट सोमय्या आणि भावना गवळी
किरीट सोमय्या आणि भावना गवळीe sakal

मुंबई : खासदार भावना गवळीच्या टीमने (MP Bhavana gawali) १०० कोटींची लूट नाही, तर माफियागिरी चालवली आहे. १८ कोटी रुपये रोख भावना गवळी यांनी विविध संस्थांमधून काढले आहेत आणि ७ कोटींची चोरी झाल्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारचे ४४ कोटी, स्टेट बँकेचे ११ कोटी रुपये यांनी बालाजी कारखाना बनवला ५५ कोटींमध्ये. आणि स्वत:च्या भावना एग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फक्त २५ लाख रुपये देऊन काबीज घेतला. भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत 7 जुलै 2019 रोजी सकाळी 5 वाजता 7 कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार वाशीम पोलीस ठाण्यात केली. मग भावना गवळी यांच्याकडे सात कोटी रुपये रक्कम आली कुठून? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांनी उपस्थित केला आहे.

खासदार भावना गवळी यांनी केलेल्या घोटाळ्याबाबत गेल्या महिन्याभरात ईडी, बेनामी प्रॉपर्टी अॅक्ट, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, अर्थ मंत्रालय, महाराष्ट्र सरकारचं सहकार मंत्रालय आणि केंद्र सरकारचं सहकार मंत्रालयाकडे पुराव्यांसह तक्रार केली आहे. स्टेट बँकेनी भावना गवळी यांच्या घराच्या जप्तीची नोटीस टाकली आहे, असेही सोमय्या म्हणाले. तसेच भावना गवळीवर ईडीची कारवाई सुरुवात आहे. यानंतर सीबीआय, आरबीआय, एसबीआय या सर्वांची कारवाई होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फक्त एवढंच काम करत आहे. भावना गवळींच्या विविध संस्थांची चौकशी सुरु आहे. मी ईडीच्या या कारवाईचं स्वागत करत आहे, असेही सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर देखील टीका केली आहे. अनिल परब यांनी रिसॉर्टबाबत ठाकरे सरकारच्या महसुल विभागाने माहीती लोकायुक्त भारत सरकार यांना कळवली आहे. हे बांधकाम गैर आहे असं घोषित केलं आहे. कोणतीही परवानगी न घेता बांधकाम केलं आहे. ५००० स्के फुट चं बांधकाम परवानगी होती. मात्र, १७००० स्के बांधकाम करण्यात आले. रिसॉर्ट बांधण्यासाठी पैसा कुठून आला? सचिन वाझेकडून आला का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

दरम्यान, आज शिवसेनेचे नेते अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर ईडीने छापेमारी केली. तसेच बालाजी पार्टीकल बोर्डमध्ये घोटाळा केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याबाबतही ईडीने छापेमारी केल्याची माहिती आङे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com