Kirit Somaiya | किरीट सोमय्या मनसुख हिरेन कुटुंबीयांच्या भेटीला; शर्मा- वाझे नवे लक्ष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya
किरीट सोमय्या मनसुख हिरेन कुटुंबीयांच्या भेटीला; शर्मा- वाझे नवे लक्ष्य

किरीट सोमय्या मनसुख हिरेन कुटुंबीयांच्या भेटीला; शर्मा- वाझे नवे लक्ष्य

किरीट सोमय्यांनी सध्या महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. सरकारमधल्या विविध नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्याचं सत्र सोमय्यांनी सुरू केलं आहे. ते सध्या चांगलेच सक्रीय असून आता सोमय्या मनसुख हिरेन या व्यावसायिकाच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

हेही वाचा: राणांचा तुरुंगातील अनुभव ऐकून इंग्रजांची आठवण झाली : सोमय्या

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर एका गाडीत स्फोटकं आढळली होती. ही गाडी मनसुख हिरेन या बांधकाम व्यावसायिकाची होती. मात्र त्यानंतर त्याचा खून झाल्याचं आढळून आलं. याच मनसुख हिरेनच्या कुटुंबीयांना आज किरीट सोमय्या भेटणार आहेत. त्यांच्या ठाण्याच्या घरी सकाळी १० वाजता ही भेट होणार आहे.

याबरोबरच किरीट सोमय्या या प्रकरणातले आरोपी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याबद्दलही आक्रमक भूमिका घेण्याची चिन्हं दिसून येत आहेत. आपल्या ट्वीटमध्ये सोमय्या म्हणतात, मी आज सकाळी १० वाजता मनसुख हिरेन याच्या कुटुंबीयांची त्यांच्या ठाण्यातल्या घरी जाऊन भेट घेणार आहे. एनआयएने हे स्पष्ट केलं आहे की, प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेनचा खून केला. त्यांना तशा पद्धतीचं काम करण्यासाठी नेमण्यात आलं होतं का?

Web Title: Kirit Somaiya Mansukh Hiren Pradip Sharma Sachin Waze

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top