
या दोन वर्षात ठाकरे मंत्रिमंडळातील एकूण 12 मंत्री, नेत्यांवर कारवाई सुरु आहे
डिसेंबरमध्ये सोमय्या आणखी धमाका करणार; शिवसेनेचे 3 नेते रडारवर
मागील काही दिवसांपासून भाजपाच्या (BJP) किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील (mahavikas aaghadi sarkar) नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. सातत्याने पत्रकार परिषद घेत त्यांनी अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. राज्यातील महाआघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीच्या निमित्तानं भाजप नेते आक्रमक झालेले दिसत आहेत. आता पुन्हा एकदा किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी खळबळजनक ट्विट केलं आहे. डिसेंबरमध्ये आणखी एक धमका करणार असल्याचं सांगितलं आहे. (shivsena)
दरम्यान त्यांनी केलेलं ट्विट असं, (Will Expose Scams of 3 More Leaders of Thackeray Sarkar in December Tomorrow I will be in Amarawati & Jalna Day After Tomorrow) ठाकरे सरकारच्या आणखी तीन नेत्यांचे घोटाळे डिसेंबरमध्ये उघड करणार आहे. उद्या मी अमरावती आणि परवा जालन्यात असणार आहे असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान या २ वर्षात ठाकरे मंत्रिमंडळातील एकूण 12 मंत्री, नेत्यांवर कारवाई सुरु आहे. महाविकास आघाडी म्हणजे महावसुली सरकार असून हे सरकार आज पर्यंतच्या इतिहासात पाहिले सरकार पाहिले आहे की 24 महिन्यात 24 मोठे घोटाळे केले आहेत. अर्धा डझन मंत्री किंवा नेते जेलमध्ये जाणार आहेत. या नेत्यांनी आणि ठाकरे सरकारनं महाराष्ट्राला (Maharashtra) लुटण्याचे काम केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. आता या नव्या खळबळजन ट्विटमुळे पुन्हा एकदा ते तीन मंत्री कोण असणार आहे ? याबद्दलच्या चर्चेला उधाण आलं आहे.