
मुख्यमंत्र्यांनी हिरेन कुटुंबीयांची माफी मागावी - किरीट सोमय्या
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकं ठेवल्याचं प्रकरण आणि त्याच संबंधित असलेलं मनसुख हिरेन प्रकरण सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणात प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हे दोन पोलीस अधिकारी दोषी आढळले आहेत. या दोघांच्या पुन्हा नियुक्त्या झाल्या की काय, अशी शक्यता किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.
किरीट सोमय्या यांनी मनसुख हिरेनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "हिरेन परिवाराची वेदना कमी होत नाहीये. ज्या यातना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उद्धट सरकारमुळे सहन कराव्या लागल्या, त्यात दिलासा इतकाच की एनआयएचा निर्णय आला त्यामुळे त्यांना धीर आलाय. आत्ताचं चार्जशीट हा पहिला भाग आहे. परिवाराला अजून पहिले दोन चार दिवस आठवतायत जेव्हा ठाकरे सरकारच्या माफिया पोलिसांनी हिरेनचं चित्र माफिया, लाचखोर म्हणून रंगवलं. मुख्यमंत्र्यांनी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी.
सोमय्या पुढे म्हणाले, "प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांना सुपारी देऊन निर्दोष लोकांची हत्या घडवण्याचं पाप ठाकरे सरकारने केलं आहे. मी एनआयएला भेटून हा तपास पुढे चालावा. त्या दोन अधिकाऱ्यांना पुन्हा नियुक्त्या मिळाल्या का, कशा मिळाल्या, त्या कोणी मिळवून दिल्या त्यांच्यावरही कारवाई करा असं सांगणार आहे. "
Web Title: Kirit Somaiya Visited Mansukh Hiren Family Uddhav Thackeray Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..