लोकमान्यांचा लढवय्या बाणा जपणाऱ्या मुक्ता टिळकांची अशी होती राजकीय कारकीर्द!

पुण्यातील कसबा पेठ मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले
Mukta Tilak
Mukta Tilakesakal

पुण्यातील कसबा पेठ मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून मुक्ता टिळक या कर्करोगाशी झूंज देत होत्या. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई होत्या. अर्थात बाळ गंगाधर टिळकांच्या त्या पणतसून लागत.(Know more about Mukta Tilak Great Grand Daughter In Law Of Bal Gangadhar Tilak BJP maharashtra politics)

मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार होत्या. मुक्ता टिळक यांनी २०१७ ते २०१९ या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले आहे. त्या भाजपच्या पहिल्या महापौर असल्याचीही माहिती आहे. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई होत्या. लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी होत्या.

Mukta Tilak : भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन

शिक्षण

पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतलं. पुणे विद्यापीठातून त्यांनी जर्मन भाषाही शिकलीय. मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीएची पदवी मिळवलीय.

शिवाय, मुक्ता टिळकांनी पत्रकारितेचं शिक्षणही घेतलंय. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केलं आहे.

असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

राजकीय कारकीर्द

आमदार होण्यापूर्वी त्या पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक 15 च्या त्या नगरसेविका म्हणून नेतृत्त्व करत होत्या. त्या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या. पुणे भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्यानंतर 2017 साली त्या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या.

त्या महापौर असतानाच 2019 साली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या होत्या.

मुक्ता टिळक यांचे पतीही भाजपमध्ये सक्रिय आहेत. मुक्ता टिळक या गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जायच्या. आता त्या गिरीश बापट यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com