या ५ कारणांमुळे एकनाथ शिंदेंनी उचललं शिवसेनेविरोधात बंडखोरीचं पाऊल

एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड हे शिवसेनेतलं ५६ वर्षांमधलं सर्वात मोठं बंड असल्याची चर्चा आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSakal

मुंबई : शिवसेनेचा निष्ठावंत, आनंद दिघेंनंतर (Anand Dighe) ठाण्यातील शिवसेनेची भिस्त सांभाळणारा शिवसैनिक, ठाण्यात शिवसेनेचा बालेकिल्ला टिकवून ठेवणारा सच्चा कार्यकर्ता, उद्धव ठाकरेंच्या गटातला आणि जुना शिवसैनिक अशी ओळख असणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पण याच एकनाथ शिंदेंची कॉलर सध्या आनंद दिघेंवरील धर्मवीर सिनेमानंतर आणखी टाईट झालीए. कारण दिघेंसोबतच एकनाथ शिंदेंच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात यात दाखवण्यात आलीए. दिघेंना देव आणि गुरु मानणारे एकनाथ शिंदे. पण, आता एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड हे शिवसेनेतलं ५६ वर्षांमधलं सर्वात मोठं बंड असल्याची चर्चा आहे. मंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई सोडून गुजरातमधल्या सूरतमध्ये मुक्काम ठोकलाय आणि यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास ३५ आमदार असल्याची चर्चा मीडियात सुरु आहे. पण विधानपरिषदेत दोन्ही शिवसेना उमेदवार जिंकून आल्यानंतरही एकनाथ शिंदेंनी मुंबई सोडून सूरत का गाठलं? एकनाथ शिंदे नाराज का आहेत यामागची ५ प्रमुख कारणं आपण जाणूण घेणार आहोत. (Eknath Shinde Latest News In Marathi)

Eknath Shinde
Eknath Shinde LIVE : शिंदे ठाम! नार्वेकर, फाटक मन वळवण्यात यशस्वी होणार?

१. मुख्यमंत्र्यांशी विसंवाद

उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या शिवसेनेची धुरा ही युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंकडेच (Aditya Thackeray) आहे. त्यातच मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष संघटना आणि शिवसेना बांधणीतला सहभाग कमी झाला आणि शिवसेनेतील महत्वाच्या अन् जुन्या नेत्यांशीही संवाद कमी झाला. यातच इतर नेते उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय बनले, पण आपल्याला डावललं जात असल्याची भावना एकनाथ शिंदेंच्या मनात बळावली गेली.

२. आदित्य ठाकरेंकडे पक्षसंघटनेची, निवडणुकीची धुरा

विधानपरिषद निवडणुकीवेळीही एकनाथ शिंदेंना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं, अशी चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. शिवाय पक्ष असो वा महाविकासआघाडीचं सरकार, महत्वाच्या निर्णयांमध्येही आदित्य ठाकरेंना महत्व मिळतं. पण शिंदेंना डावलल्याची भावना आहे. शिवाय पक्षसंघटनेतही आदित्य ठाकरे वरुण सरदेसाईंसोबत नव्या युवा चेहऱ्यांना घेऊन पक्ष मजबूत करताहेत. त्यामुळे बाळासाहेबांशी एकनिष्ठ आणि उद्धव ठाकरेंशी जवळीक असलेल्या नेत्यांना बाजूला सारलं जात असल्याची भावना उद्धव ठाकरेंच्या जवळचे असणाऱ्या गटात आहे. (Maharashtra Political News In Marathi)

Eknath Shinde
एकनाथ शिंदेंचे ठाकरे सरकारला तीन प्रस्ताव, आमदार वर्षाकडे रवाना

३. नगरविकास खात्यात हस्तक्षेप

नगरविकास खात्याचा कारभार एकनाथ शिंदेंकडे असला तरी त्यांच्या कामात इतर दोन मंत्र्यांचा हस्तक्षेप होत असतो. त्यामुळे मनमोकळेपणाने काम करता येत नसल्यानं नाराजी होती. शिवाय, नगरविकासमंत्री असूनही प्रत्येक निर्णयाअंती सही करण्याआधी किंवा मंजुरीआधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंजुरी घ्यावी लागते. याबाबत सचिव आणि अधिकारी वर्गाकडून एकनाथ शिंदेंना वारंवार सांगितलं जायचं. त्यावरही एकनाथ शिंदे नाराज होते, असं कळतंय.

४. अजित पवारांसोबत स्पर्धा

राज्यसभेला अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटानं भाजपला म्हणजेच देवेंद्र फडणवीसांना (Devendra Phadanvis) मदत केल्याची चर्चा होती. त्यामुळे कायमच अजित पवारांशी स्पर्धा करावी लागत असल्यानंही एकनाथ शिंदेंनी मोठं पाऊल उचललं असेल अशी चर्चा आहे.

Eknath Shinde
'काय करायचं ते दिवसा करा, जागरणे सोसवत नाहीत आता'; शिंदे प्रकरणावर मीम्सचा पाऊस

५. संजय राऊतांची वक्तव्यं न पटणारी

दररोज सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदांमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) शरद पवार (Sharad Pawar) यांचीच बाजू मांडत असून शिवसेनेला याचा फटका बसत असल्याचं मत एकनाथ शिंदेंचं होतं. त्यामुळे संजय राऊतांच्या रोजच्या पत्रकार परिषदा आणि त्यांच्या वक्तव्यांवर एकनाथ शिंदे नाराज होते असंही बोललं जातंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com