Poonam Mahajan: 'माझ्या बापाला मारणारा मास्टरमाइंड माहीत आहे पण...'पूनम महाजनांचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Poonam Mahajan

Poonam Mahajan: 'माझ्या बापाला मारणारा मास्टरमाइंड माहीत आहे पण...'पूनम महाजनांचा आरोप

वांद्रे येथील सभेला संबोधित करताना पूनम महाजन यांनी कॉग्रेस राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. मी तुम्हाला शकुनी म्हंटल्यावर इतर पक्षातील लोक मला तू हे बोलणारी कोण? असा सवाल करतील. माझ्या घराबाहेर मोठी पोस्टर लावतील. तुझ्या बापाला कोणी मारलं असा सवाल करतील. माझ्या वडिलांना कोणी मारलं हे मला माहीत आहे. पण त्यामागचा मास्टरमाइंड कोण होता? तुम्ही सत्तेत होतात. तेव्हा तुम्ही हा मास्टरमाइंड का नाही शोधला ? असा संतप्त सवाल भाजप नेत्या, खासदार पूनम महाजन यांनी केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मला माहीत आहे माझ्या बापाला कोणी मारलं. प्रत्येकवेळी तो प्रश्न करून फरक पडणार नाही. पण यामागचा मास्टरमाइंड कोण होता ते तुम्ही सत्तेत असताना का शोधलं नाही? असा प्रश्नही पूनम महाजन यांनी केला आहे. शिवसेना-भाजप-रिपाइंच्या युतीतून मी 2014 आणि 2019 मध्ये मी खासदार झाले. त्याचा मला अभिमान आहे. जनतेने विश्वास दाखवून निवडून दिलं. त्याचा मला अभिमान आहे. आमच्या मित्रपक्षाला जनमताचा का अभिमान नव्हता? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

हेही वाचा : का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान !

पुढे त्या म्हणाल्या की, दोन भावात म्हणा, मित्रांमध्ये म्हणा युतीत भांडण झालं, महाभारत झालं असं तुम्ही म्हणता. हे महाभारत घडवणारे शकुनी कोण कोण होते? ते तुम्हाला माहीतच असेल. या शकुनींनी महाभारत रचलं आणि स्वत: सत्तेवर जाऊन बसले. 2019 ते 2022 दरम्यान दोन भावात महाभारत घडलं. घडलं ते घडलं, असंही त्या म्हणाल्या. “दररोजचा ओघ पाहून सर्वच पक्ष चिंतातूर झाले आहेत. असाच ओघ राहिला तर समोर राहणार काय? त्यामुळे नवीन बातम्या पसरवल्या जात आहेत. मध्यावधी निवडणुका लागतील असं बोलत आहेत. अरे तुमचं लॉजिक काय?”, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

त्याचबरोबर या सरकारकडे 170 आमदारांचं बहुमत आहे. एक मजबूत सरकार या राज्यामध्ये काम करतंय. आम्ही दिवसेंदिवस लोकहिताचे निर्णय घेतोय. तर जाणीवपूर्वक काही लोक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण आघाडीतही काही आलबेल दिसत नाहीय”, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :pramod mahajan