KDCC Result :विरोधकांनी खाते उघडले : सत्तारूढ गटाला धक्का; मंडलिक, आसुर्लेकरांचा मोठा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Mandlik

KDCC Result : विरोधकांनी खाते उघडले : मंडलिक, आसुर्लेकरांचा विजय

कोल्हापूर: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व आमदार विनय कोरे यांनी प्रतिष्ठेच्या ठरवलेल्या प्रक्रिया संस्था गटात विद्यमान संचालक व विरोधी पॅनेलचे प्रमुख खासदार प्रा. संजय मंडलिक व संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले.(Kolhapur District Bank Election 2022)

प्रा. संजय मंडलिक व संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले. या गटातील सत्तारूढ गटाचे उमेदवार प्रदीप पाटील-भुयेकर व मदन कारंडे यांचा मोठा पराभव झाला. या दोघांना अनुक्रमे ११९ व १२२ मते मिळाली तर विजयी उमेदवार प्रा. मंडलिक यांना ३०६ तर आसुर्लेकर यांना ३२९ मते मिळाली.या गटातील जागेवरूनच सत्तारूढ गट व शिवसेनेचे बिनसले होते. त्यात डॉ. कोरे यांनी श्री. आसुर्लेकर यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला होता. आसुर्लेकर पॅनेलमध्ये नसतील तर मीही तुमच्यासोबत नाही असा पवित्रा खासदार मंडलिक यांनी घेतला होता. कोरे यांच्या विरोधामुळे सत्तारूढ गटाने आसुर्लेकर यांना वगळले तर जागा वाटपाच्या वादातून प्रा. मंडलिकही बाहेर पडले. या दोघांनी या गटातून एकतर्फी विजय मिळवत या गटाचे आम्हीच शिलेदार असल्याचे दाखवून दिले. या दोघांचा विजय हा सत्तारूढ गटासाठी मोठा धक्का समजला जातो.

नुरा कुस्तीची चर्चा

या गटात सत्तारूढ व विरोधी गटात नुरा कुस्ती झाल्याची चर्चा होती. प्रा. मंडलिक व आसुर्लेकर यांच्या विजयाने ही शक्यता अधिक गडद झाली आहे. हे दोन्ही उमेदवार सत्तारूढमध्ये हवेत अशी श्री. मुश्रीफ यांची इच्छा होती, तथाप कोरेंच्या विरोधामुळे तेही हतबल ठरल्याचे पॅनेलच्या निश्‍चितीवरून स्पष्ट झाले.

Web Title: Kolhapur Bank Election Sanjay Mandlik Babasaheb Patil Asurlekar Victorious

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top