
कोल्हापूर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दूध उत्पादकांना आनंदाची बातमी दिली आहे. गोकुळने म्हैस आणि गाय दोन्ही प्रकारच्या दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर एक रुपयांची वाढ जाहीर केली आहे. हा निर्णय दूध उत्पादकांना दूध संकलनात वाढ करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आला आहे.