Bhajan and Abhang Competition : कोल्हापूर कारागृहाला ज्ञानोबा-तुकोबा महाकरंडक

कारागृहातील कैद्यांसाठी आयोजित राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेत कोल्हापूर कारागृहाने प्रथम क्रमांक पटकाविला.
Bhajan and Abhang Competition
Bhajan and Abhang Competitionsakal
Updated on

पुणे - कारागृहातील कैद्यांसाठी आयोजित राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेत कोल्हापूर कारागृहाने प्रथम क्रमांक पटकाविला. संघाला ज्ञानोबा-तुकोबा महाकरंडक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत येरवडा, पुणे कारागृहाचा संघ द्वितीय तर नाशिक कारागृहाचा संघ तृतीय आला. या संघांना अनुक्रमे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र, संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात देण्यात आले.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कारागृह विभागाच्या वतीने आयोजित स्पर्धेची महाअंतिम फेरी मंगळवारी (ता. १३) येरवडा कारागृहात घेण्यात आली. नाशिक, नागपूर, कोल्हापूर, तळोजा, पुणे आणि अमरावती या संघात अंतिम फेरी झाली. पारितोषिक वितरण गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे (अपील व सुरक्षा) यांच्या हस्ते झाले.

अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, स्वाती साठे, नंदकुमार बंड यांची प्रमुख उपस्थिती होती. तळोजा, अमरावती व नागपूर या संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

Bhajan and Abhang Competition
Ashadhi Wari : वारीनंतरही महिनाभर भजन, किर्तनाचा आवाज कानात घुमतो

कैद्यांसाठी कारागृहाच्या परिसरात डिजिटल लायब्ररी आणि उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी अपेक्षा प्रास्ताविकात लक्ष्मीकांत खाबिया यांनी व्यक्त केली. आभार डॉ. जालिंदर सुपेकर यांनी मानले.

महाअंतिम फेरीचा प्रारंभ जगद्गुरू संत तुकाराम महाराज देहू संस्थानचे प्रमुख पुरुषोत्तम महाराज मोरे आणि पालखी सोहळा प्रमुख-विश्वस्त अनिल महाराज मोरे, उद्योजक राजेश सांकला यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून झाला. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विवेक थिटे, प्रा. ज्ञानदेव शिंदे, सोनल जगताप, अच्युत कुलकर्णी, रोशन खोब्रागडे, वीरेंद्र लाटनकर, संदीप राक्षे, शेखर पाटील, किरण सानप, राकेश खराडे, पांडुरंग जगगेश्वर यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com