निपाणीतील युवतीचा लोणावळ्याजवळ अपघाती मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

निपाणी - भरधाव येणाऱ्या रेल्वेला चुकविण्यासाठी रुळाबाहेर उडी मारताना दगडावर डोके आपटून निपाणीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. 1) लोणावळ्याजवळ घडली. स्नेहल मोहन किर्तीकर (वय 24, मूळ गाव भोसरी-पुणे सध्या रा. निपाणी) असे तिचे नाव आहे.

निपाणी - भरधाव येणाऱ्या रेल्वेला चुकविण्यासाठी रुळाबाहेर उडी मारताना दगडावर डोके आपटून निपाणीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. 1) लोणावळ्याजवळ घडली. स्नेहल मोहन किर्तीकर (वय 24, मूळ गाव भोसरी-पुणे सध्या रा. निपाणी) असे तिचे नाव आहे. स्नेहल ही मैत्रीणीच्या बहिणीच्या मुलीचा वाढदिवस साजरा करून परतत असताना हा अपघात झाला. 

स्नेहल किर्तीकर हिचे वडील निपाणी येथील आयडीबीआय बॅंकेत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे पती-पत्नी येथील बसवान नगरात वास्तव्य आहेत. सीए अभ्यासक्रमासाठी स्नेहल ही पुण्यातील वसतीगृहामध्ये आपल्या मैत्रिणीसह राहत होती. पिंपळोली गावातील त्यांची मैत्रीणीकडे वाढदिवसासाठी गेली होती. रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास कामशेत रेल्वेस्थानकाच्या पलीकडे रुळ ओलांडताना दगडाला अडकळून ती पडली. त्यामुळे तिच्या डोक्‍याला जबर मार लागून त्यात तिचा मृत्यू झाला. लोणावळा लोहमार्ग पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. 

Web Title: Kolhapur News girl dead in an accident near Lonavala