कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची जोरदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कडक उन्हासह उकाडा वाढला होता. मात्र रविवारी (ता. ६) दुपारनंतर उशिरा राज्यातील बहुतांशी भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सोमवारी (ता. ७) सकाळी आठवाजेपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये १०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

पुणे - गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कडक उन्हासह उकाडा वाढला होता. मात्र रविवारी (ता. ६) दुपारनंतर उशिरा राज्यातील बहुतांशी भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सोमवारी (ता. ७) सकाळी आठवाजेपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये १०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पालघर जिल्ह्यातील डहाणू व वाडा तालुक्यात वीज अंगावर कोसळून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत अन्य सहा तरुण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पावसामुळे काही ठिकाणी काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: konkan central maharashtra heavy rain