छेडछाडीनंतर कोरियन युट्यूबर म्हणाली, मला भारतात...; Mumbai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Korean YouTuber

Mumbai: छेडछाडीनंतर कोरियन युट्यूबर म्हणाली, मला भारतात...

मुंबईच्या खारमध्ये एका युट्युबरचा लाईव्ह व्हीडिओदरम्यान विनयभंग करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली. या घटनेवर साऊथ कोरियन युट्युबर Hyojeong Park हीने पोलिसांचे आभार मानले. (Korean YouTuber reacts to Mumbai Police along with India)

दोनदिवसांपूर्वी, प्रसिद्ध कोरियन युट्यूबरसोबत धक्कादायक घटना घडली होती. लाईव्हा स्ट्रिमिंग दोघांनी तिचा विनयभंग केला. यावेळी तिच्याच एका फॉलोअरने मुंबई पोलिसांना टॅग करत घटना शेअर केली. त्यावेळी मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनेची गंभीरतेने दखल घेत दोघांना अटक केली.

त्यानंतर साऊथ कोरियन युट्युबरने मुंबई पोलिसांसह भारताचे कौतुक केले आहे.

काय म्हणाली कोरियन युट्यूबर?

माझ्यासोबत असा प्रकार इतर देशांमध्येही झाला. तेथेही पोलिसांना घटनेची माहिती दिली होती पण मुंबईमध्ये तातडीने झालेली कारवाई पूर्वी कधीच झाली नव्हती. मुंबई मध्ये माझा 3 आठवड्यांचा राहण्याचा प्लॅन आहे. हा प्लॅन आता मी अजून वाढवणार आहे. एका वाईट घटनेमुळे मी माझा ट्रॅव्हल प्लॅन बदलणार नाही. तसेच मला भारताबद्दल चांगल्या गोष्टी इतरांनाही दाखवायच्या आहेत, अशी प्रतिक्रिया तिनं दिली.

नेमकं काय घडलं?

ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. ही प्रसिद्ध युट्यूबर आहे. भारतातील विविध ठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करत असते. तशीच एक लाईव्हा स्ट्रिमिंग करण्यासाठी काल ती खारच्या रोड क्रमांक ५ वर आली होती. त्या ठिकाणी ती लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना ती दोन तरुणांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी या दोन तरुणांनी तिला ओढण्याचा, तिचे चुंबन घेण्याचा, तिला गाडीवर बळजबरीने बसवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं लाईव्ह सुरू होत.

ही तरुणी घटनास्थळावरुन दूर जाऊ लागल्यानंतर तोच तरुण आपल्या एका मित्रासह बाईकवरुन पुन्हा तिच्या दिशेने आला आणि तिला जिथे जायचं आहे सोडण्याची ऑफर दिली. मात्र तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

टॅग्स :Mumbai Newsmumbai police