क्रांती रेडकरच्या ट्विटमध्ये मलिकांचा उपहास; शुभेच्छा दिल्या अन् म्हणाल्या...

समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Political
Politicalesakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक आज सकाळी अंमलबजावणी संचालनालय ईडी (ED)कार्यालयात दाखल झाले होते आहेत. त्यांना सात तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी केली जात होती. आता राजकीय वर्तुळातून याप्रकरणी प्रतिक्रिया येत आहेत. मात्र आता एक वेगळीच बातमी समोर आली आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची सध्या चर्चा सुरु आहे.

Political
मलिकांवरील कारवाईनंतर घडामोडींना वेग, पवारांकडून तातडीची बैठक

मागील काही दिवसांपूर्वी वानखेडे-मलिक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता या वादात समीर वानखेडेच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी उडी घेतली. आज सकाळी मलिक यांच्या घरी ईडीने छापा मारला. त्यानंतर मलिक हे ईडीच्या कार्यालयात चैाकशीसाठी गेले. त्यानंतर क्रांती रेडकर यांनी एक टि्वट केलं असून त्यांचा संबध या घटनेशी जोडला जात आहे. क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ 'तान्हाजी' चित्रपटातील 'माय भवानी' गाण्याचा आहे.

दरम्यान, आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यानंतर क्रांती रेडकर यांच्या ट्विटवरील व्हिडिओवरही उलट-सुलट चर्चा सुरु आहे. भाजपाने सुडपोटी ही कारवाई केली असल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. याप्रकरणी आता थोड्याच वेळात विरोधी पक्षनेते पत्रकार परिषद घेणार आहेत.

Political
अटकेनंतर मलिकांना मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही - चंद्रकांत पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Onion
shalarth Id froud
Crime
Maharashtra Sugar Industry Gets Relief Plan as Government Proposes 4000 Crore Soft Loan Before Crushing Season
Marathi News Esakal
www.esakal.com