राज ठाकरेंना लाच देण्यासाठी कुणाल कामरा थेट 'हे' घेऊन पोहोचला!

वृत्तसंस्था
Tuesday, 4 February 2020

कॉमेडियन असलेल्या कुणाल कामराने आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज बंगल्यावर हजेरी लावली आहे. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे तो लाच देण्यासाठी राज यांच्या बंगल्यावर पोहोचला आहे. 

मुंबई : सध्या एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे कुणाल कामरा.. मागच्याच आठवड्यात इंडिगो विमानात संपादक अर्णब गोस्वामी यांना वादग्रस्त बोलल्यानंतर कुणालची प्रसिद्धी अचानक वाढली. आता तो जे काही करेल ते लक्ष वेधणारं असतं. आता पुन्हा एकदा त्यांने असं काही केलंय ज्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे. कॉमेडियन असलेल्या कुणाल कामराने आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज बंगल्यावर हजेरी लावली आहे. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे तो लाच देण्यासाठी राज यांच्या बंगल्यावर पोहोचला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कुणाल थेट राज यांच्या दादर येथील कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचला आणि त्याने चक्क राज यांच्यासाठी लाच आणली. ही लाच पैशांची किंवा इतर गोष्टींची नसून वडापावची आहे! कुणालने राज यांच्यासाठी त्यांचे आवडते 'किर्ती वडे' आणले आहेत. किर्ती कॉलेजजवळचे किर्ती वडे राज यांना खूप आवडतात असा शोध कुणालने लावले व हे वडे घेऊन तो थेट कृष्णकुंजवर गेला. त्याने राज यांच्यासाठी एक पत्रही लिहिलं आहे. 

पत्रात कुणाल राज यांना म्हणतो की, तुम्ही मला वेळ द्यावा. मी बरंच संशोधन केलं आणि तुम्ही किर्ती वड्याचे चाहते आहात असं मला कळलं. म्हणून लाच म्हणून मी तुमच्यासाठी किर्ती वडे आणले आहेत. ज्यामुळे तुम्ही माझ्या 'शट अप कुणाल' या कार्यक्रमात सहभागी व्हाल. पत्राच्या अखेरीस त्याने म्हणले आहे की, मला आशा आहे की तुम्ही माझ्या कार्यक्रमाला याल.

या पत्राचा फोटो शेअर करतक कुणालने ट्विट केलंय की, राज माझ्या कार्यक्रमाला वेळ द्या. लोकांना वाटतं की मला पाहुण्याना बोलवण्यात काही कष्ट पडत नाहीत. पण बघा तुम्हाला बोलवण्यासाठी मला काय काय करावं लागतंय आणि तुम्ही कार्यक्रमावा यावं यासाठी मी आणखी प्रयत्न करणार आहे. 

अर्णब गोस्वामी यांच्याशी गैरवर्तन केल्यामुळे इंडिगो व एअर इंडियाने त्याच्यावर 6 महिन्यांची बंदी घातली आहे. यावर त्याच्या वकिलांनी ही बंदी हटविण्याची व 25 लाख रूपये नुसकान भरपाई देण्याची मागणी केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kunal Kamra went to Raj Thackeray home for giving bribe