Saam TV- साम टीव्हीच्या 'सावित्री आता घरोघरी, ज्योतिबाचा शोध जारी' ला 'लाडली मीडिया' पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साम टिव्हीला पुरस्कार
साम टिव्हीच्या वार्तांकनाचा गौरव

साम टीव्हीच्या 'सावित्री आता घरोघरी, ज्योतिबाचा शोध जारी' ला 'लाडली मीडिया' पुरस्कार

Laadli Media Award To Saam TV News

Laadli Media Awards 2022: पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठीचा लाडली मीडियातर्फे दिला जाणाऱ्या यंदाच्या प्रादेशिक पुरस्काराची मानकरी साम टीव्ही वृत्तवाहिनीला (Saam TV News) ठरली आहे. जेंडर सेन्सीटायझेशन म्हणजे लिंगसमभाव जाणीव जागृतीसाठी प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांना United Nations Fund for Population Activities या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

"सावित्री आता घरोघरी, ज्योतिबाचा शोध जारी" या शीर्षकाखाली साम टिव्हीनं अनेक स्पेशल रिपोर्टस् प्रसारित केले होते, समाजातील कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाचा प्रवास आणि त्यांची एकूणच वाटचाल यांचा आढावा या रिपोर्ट्समध्ये घेण्यात आला होता. याची दखल घेत यंदाचा लाडली मीडिया पुरस्कारचा बहुमान साम टीव्हीला मिळाला आहे. २ नोव्हेंबर २०२२ ला बुधवारी हैदराबाद येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. (Laadli Media Awards 2022 Latest News Saam TV)

हैदराबाद येथील मौलाना आझाद राष्ट्रीय विद्यापीठात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साम टीव्हीच्या वृत्तनिवेदिका सोनाली शिंदे (Sonali Shinde) यांनी सामच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. "सावित्री आता घरोघरी, ज्योतिबाचा शोध जारी" या विशेष कार्यक्रमासाठी साम टीव्हीच्या अनेक प्रतिनिधींनी फील्डवर प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन वृत्तसंकलन केलं होतं. नवनाथ सकुंडे, संभाजी थोरात, अश्विनी जाधव केदारी, जयश्री भिसे मोरे, ओंकार कदम, दिनू गावित यांचा यात समावेश होता. सोबतच व्हिडिओ जर्नालिस्ट, ग्राफिक्स टीम आणि इतर तांत्रिक सहाय्य करणाऱ्या सहकाऱ्यांचीही यात मोलाची भूमिका होती.

United Nations Population Fund चे प्रतिनिधी श्रीराम हरिदास, मौलाना आझाद राष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सय्यद हसन, British Deputy High Commissioner Gareth Wynn Owen, 'लाडली मीडिया'च्या प्रमुख शारदा एल आणि ज्येष्ठ अभिनेत्री डॉली ठाकूर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते २ नोव्हेंबरला झालेल्या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला.

टॅग्स :awardmedia