"इतिहासाचं ज्ञान कमी असल्याने अशा लज्जास्पद चुका होऊ शकतात" | Varsha Gaikwad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Varsha Gaikwad and Kangana Ranaut

"इतिहासाचं ज्ञान कमी असल्याने अशा लज्जास्पद चुका होऊ शकतात"

अभिनेत्री कंगना रणौतने Kangana Ranaut देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. "१९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं," असं विधान कंगनाने केलं. तिच्या या विधानावर ट्विट करत महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी कंगनाला खोचक टोला लगावला आहे. 'इतिहासाचं ज्ञान कमी असल्याने अशा लाजिरवाण्या चुका आणि गैरसमज होऊ शकतात,' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

वर्षा गायकवाड यांचं ट्विट-

'इतिहास हा खूप महत्त्वाचा विषय आहे, सर्व विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी याचा नीट अभ्यास केला पाहिजे. इतिहासाचं ज्ञान कमी असल्याने अशा लाजिरवाण्या चुका आणि गैरसमज होऊ शकतात,' असं त्यांनी कंगनाचा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय.

हेही वाचा: "१९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक"; कंगनाच्या विधानावरून नवा वाद

नेमकं काय म्हणाली कंगना?

"सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांना हे माहित होतं की रक्तपात झाला तरी हिंदुस्तानी हा हिंदुस्तानीवर वार करणार नाही. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली हे खरं. पण ते स्वातंत्र्य नव्हतं, भीक होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं," असं कंगना 'टाइम्स नाऊ'च्या समिटमध्ये म्हणाली.

loading image
go to top