esakal | भारत-पाकिस्तान युद्ध सुरु आहे का?, UP हिंसाचारावरुन राऊतांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत - PM मोदी

भारत-पाकिस्तान युद्ध सुरु आहे का?, UP हिंसाचारावरुन राऊतांचा सवाल

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. संतापाची लाट उसळली आहे. याच प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, भारत-पाकिस्तान युद्ध सुरु आहे का? अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना हे रामराज्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केलाय. लखीमपूर खेरीमध्ये झालेलं प्रकरण गंभीर आहे. यावर तुम्ही माफी मागत आहात का? शेतकऱ्यांना चिरडण्याचा विषय आहे. यावर माफी मगितलीच पाहिजे. देशात अघोषित आणिबाणी सुरू आहे. पण शेतकरी, जनता लढत राहतील, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

भारत-पाकिस्तान युद्ध सुरु आहे का? उत्तर प्रदेश हा भारताचाच एक भाग आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही याच राज्यातून निवडून आले आहेत. विरोधी पक्षांना राज्यात येण्यास मनाई केली जात आहे. तेथे दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लखनौला येण्यास मनाई केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस बांधावर जाऊन मागण्या करत आहेत. आम्ही त्यांना कोणताही मनाई केली नाही. विरोधी पक्षाचं ते काम आहे. पण मग उत्तर प्रदेशमध्ये मनाई का केली जात आहे. असा संतप्त सवाल राऊत यांनी विचारला.

लखीमपूर दुर्घटना ही शेतकरी, मजूर यांच्यासाठी लांच्छनास्पद आहे. हा एका राज्याचा विषय नाही, अन्यायासाठी लढणाऱ्यांना असं केलं जातं असेल तर जगासाठी हे धोकादायक आहे. अशी घटना महाराष्ट्र, केरळ, राजस्थान मध्ये झाली असती तर भाजप रस्त्यावर उतरली असती. पण आज शेतकऱ्यांचे दुःख समजावून घ्यायला पण तिथं कुणाला जाऊ दिल जातं नाही, असे राऊत म्हणाले.

प्रियंका गांधींना ताब्यात घेतल्याचाही त्यांनी निषेध केला आहे. प्रियांका गांधी यांच्याशी तुमचं राजकीय वैर असू शकतं, काँग्रेसशी असू शकतं, पण त्यांचा गुन्हा काय आहे? FIR अथवा कोणतेही वॉरंट नसताना ताब्यात घेतलं. त्या इंदिरा गांधी यांची नात आहेत, त्या महिला आहेत. ज्या पद्धतीने पोलिस प्रियांका गांधी यांच्याशी वागले ते आदेशच होते, असेही राऊत म्हणाले.

loading image
go to top