
मुंबई - तोट्यात असलेल्या एसटीला नफ्यात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे पडून असलेल्या तब्बल अठराशे हेक्टरपैकी बाराशे हेक्टर वापरण्यायोग्य जमीन भाडेतत्त्वावर ‘बांधा- वापरा आणि हस्तांतर करा’ या योजनेच्या माध्यमातून पाच वर्षांत विकसित करणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.