Landslides Alert: पुढील ४८ तास महत्त्वाचे, 'माळीण'सारखी घटना घडण्याची भीती, राज्यातील 'या जिल्ह्यांना धोका

Landslides Alert (file photo)
Landslides Alert (file photo)

Landslides Alert: राज्यात सर्वदूर मॉन्सून पोहोचल्याने अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आज (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत. महराष्ट्रातील पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे  याठीकाणी दरळ कोसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सतर्क'ने याबाबत अपडेट दिले आहे. त्यामुळे घाट रस्त्यांवरून प्रवास करताना काळजी घेणे. तसेच जीर्ण वाडे, घरे, टेकड्यांच्या उतारावर/ पायथ्याशी असणाऱ्या कुटुंबांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Landslides Alert (file photo)
Monsoon Update : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेची शक्यता हवामान खात्याने दिला इशारा

पावसाच्या हजेरी, ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात घसरण होत आहे. सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बुहतांश ठिकाणी तापमान २७ ते ३६ अंशाच्या दरम्यान होते. राज्यात सर्वदूर पावसाने हलक्या ते मध्यम हजेरी लावली असून, कोकणात पावसाचा जोर कायम आहे.

वायव्य भारतात मॉन्सूनची प्रगती

यंदा केरळसह देशात यंदा काहीसा उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनने वेगाने घोडदौड देशाचा बहुतांशी भाग व्यापला आहे. सोमवारी (ता. २६) वायव्य भारतात मॉन्सूनने प्रगती केली असून, जम्मू काश्मिर, लडाख व्यापून, उत्तर अरबी समुद्र, गुजरात, राजस्थान, हरियाना, पंजाबच्या आणखी काही भागात मान्सून दाखल झाला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) - पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) - सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) - बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.

Landslides Alert (file photo)
PM Modi on UCC : एका घरात दोन कायदे असतात का? समान नागरी कायद्यासाठी मोदींनी दिले बांगलादेशचे उदाहरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com