लासलगावच्या हापूसला ‘न्यूयॉर्क’ची हाक; भाभा अणुसंशोधन केंद्र विकिरण प्रक्रियेमुळे पहिल्यांदाच थेट अमेरिकेत निर्यात

Lasalgaon Hapus Mango Export to New York : अमेरिकेच्या मान्यतेसाठी आवश्यक तपासणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, अमेरिकेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लासलगाव केंद्राची पाहणी करून निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणपत्र दिले.
Lasalgaon Hapus Mango Export to New York

Lasalgaon Hapus Mango Export to New York

esakal

Updated on

लासलगाव : येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बार्क) कृषक विकिरण केंद्रातून यंदा प्रथमच चवदार हापूस आंब्याने थेट अमेरिकेतील न्यूयॉर्ककडे झेप घेतली आहे. मंगळवारी (ता.७) तब्बल ११०० बॉक्समधील सुमारे ४ टन हापूस व केशर आंबा विकिरण प्रक्रिया पूर्ण करून निर्यातीसाठी रवाना करण्यात आला, अशी माहिती प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिली. अमेरिकेच्या मान्यतेसाठी आवश्यक तपासणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, अमेरिकेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लासलगाव केंद्राची पाहणी करून निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणपत्र दिले. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com