तळीये गावच्या पुनर्विकासासाठी रायगड ट्रस्ट देणार ४ एकर जमीन

मागच्या आठवड्यात तळीये गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेत ३५ पेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला.
mahad landslide
mahad landslidesakal

मुंबई: मागच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा रायगड जिल्ह्यातील तळीये गावाला (taliye village) मोठा फटका बसला. महाड तालुक्यात येणाऱ्या तळीये गावावर दरड कोसळली. (landslide) या दुर्घटनेत ३५ पेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. अतिशय दुर्गम भागातील या गावात शासन सर्व मदत करेल, (govt help) असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना (villagers) दिले होते. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत, ‘तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ’ अशी ग्वाही दिली होती. (last week in raigad district taliye village hit by Landslide for redevlopment raigad trust will give four acres land dmp82)

त्यामुळे आज गृहनिर्माण खात्यानं तातडीची बैठक बोलवली होती. तळीये गावाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन दिवसापूर्वीच तळीये गाव महाडा वसवणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. तळीये गावच्या पुनर्विकासासाठी रायगड ट्रस्ट ४ एकर जमीन देणार आहे.

mahad landslide
प्रियकराला धावत्या ट्रेनमधून ढकललं, कोपर-दिवा दरम्यानची धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीराजे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना फोन केला होता. तळीये गावाचा पुनर्विकास म्हाडा करणार, यासाठी तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. महाडाचे अभियंते आणि मंत्री तळीये गावात जाऊन पाहणी करणार आहेत.

mahad landslide
महिला वकिलाने केला बलात्काराचा आरोप, व्हिडिओ क्लिप काढून ५० लाखाची मागणी

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड तालुक्यातील तळीय येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर गंभीर पूरस्थितीचा सामना करण्यासाठी रायगड व रत्नागिरीसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तर अन्य जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत व जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असं सांगिलं आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com