esakal | "आरे'तील झाडे तोडू नका - लता मंगेशकर 
sakal

बोलून बातमी शोधा

Lata Mangeshkar opposed the cutting of trees in the Aarey Colony

गोरेगाव येथील आरे वसाहतीतील दोन हजार 700 झाडे तोडण्यास गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही विरोध केला आहे. "जैववैविध्याला हानी पोचू नका,' असे आवाहन त्यांनी ट्‌विटरवरून केले आहे. 

"आरे'तील झाडे तोडू नका - लता मंगेशकर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - गोरेगाव येथील आरे वसाहतीतील दोन हजार 700 झाडे तोडण्यास गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही विरोध केला आहे. "जैववैविध्याला हानी पोचू नका,' असे आवाहन त्यांनी ट्‌विटरवरून केले आहे. 

महापालिका वृक्ष प्राधिकरणाच्या गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील दोन हजार 700 झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्या निर्णयाविरोधात वृक्षप्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या झाडांच्या संरक्षणासाठी "सेलिब्रिटी'ही रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, आरे वसाहतीतील झाडे तोडण्याचा निर्णय रद्द करा, अशा मागणीचे ट्‌विट लता मंगेशकर यांनी केले. 

प्रस्ताव मंजूर झाला असला, तरी अद्याप वृक्ष तोडण्यास परवानगी दिलेली नाही, असे महापालिका प्रशासनाने न्यायालयात सांगितले. यावरून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना विरुद्ध प्रशासन असा वाद उफाळून आला आहे. 

loading image
go to top