esakal | महाराष्ट्र पोलिसांना अत्याधुनिक सुविधा - उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray

पोलिसांसाठी निवासस्थान 
महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्यावतीने मुंबई पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात येणाऱ्या मरोळ येथील निवासस्थानाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतिगृह, वसतिगृह, क्रीडासंकुल यांच्यासह सर्व सुविधायुक्त ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी तळमजल्यासह सात मजल्यांच्या सोळा इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे २२५ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलिसांना अत्याधुनिक सुविधा - उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - महाराष्ट्र पोलिस दलाला जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात पोलिस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. संचलनास मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रमेश लटके, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते.

दोन वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण होणार : अजित पवार

ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्र पोलिस दलाला तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला होता. हा ध्वजाचा मान मिळविणे जितके अभिमानास्पद आहे, तितकेच हा मान टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे आहे.

पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले, त्यासाठी पोलिसांना ‘मानाचा मुजरा’ या शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुकोद्‌गार काढले.

बदलत्या कालानुरूप पोलिसांपुढे आव्हानेही मोठी आहेत. विघातक शक्ती अत्याधुनिक गोष्टी वापरू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे राहावे लागेल. यासाठी जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण आणि सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. सुविधांच्या रूपाने पाठबळ दिले जाईल.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

loading image
go to top