Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Latest Marathi News: ओबीसी-मराठा समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी एल्गार मेळाव्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या काळात ओबीसींच्या सभा होतील.
Marathi News LIVE Updates
Marathi News LIVE UpdateseSakal

९ तासांच्या चौकशीनंतर लालू प्रसाद यादव ईडी कार्यालयाबाहेर

RJD अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची लँड फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशी झाली. सुमारे 9 तासांनंतर ते ईडी कार्यालयाबाहेर आले.

रवींद्र वायकर यांची आजची ईडी चौकशी संपली

९ तास चौकशी झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर हे ईडी कार्यालयाबाहेर आलेले आहेत.

मुंबईमध्ये ११ ड्रग्ज तस्करांना अटक

मुंबई क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने मुंबईतील विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये 11 ड्रग्ज तस्करांना अटक केली असून 2.22 कोटी रुपये किमतीचे 1.130 किलो एमडी (मेफेड्रोन) जप्त केले.

...तर इथून पुढच्या निवडणुका होणार नाहीत- मल्लिकार्जुन खर्गे

देशामध्ये भाजपचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर इथून पुढच्या निवडणुका होणार नाहीत, असं विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलं आहे.

सरकार कोणत्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही - फडणवीस

नागपूर : "आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, हे मी स्पष्ट करतो. ओबीसी समाजाचे रक्षण आपल्याला करायचे आहे, याची जाणीव स्वत: मुख्यमंत्र्यांना आहे... जोपर्यंत भाजपचे सरकार आहे तोपर्यंत, आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींना संरक्षण देता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तर मी स्वतः जाऊन आमच्या वरिष्ठांशी बोलेन, पण काहीही झाले तरी ओबीसींवर अन्याय होणार नाही, अशी भाजपची भूमिका आहे..." असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

India Alliance Meeting : उद्या इंडिया आघाडीची महत्वपूर्ण बैठक

उद्या इंडिया आघाडीची महत्वाची बैठक होणार असून या बैठकीत लोकसभा निवडणूक जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित राहाणार असल्याची माहिती समोर आली आहे. साम टीव्हीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या वंचित लोकसभेच्या दोन जागांवर दावा करण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar News : कोल्हापूरच्या कागल येथे अजित पवारांचं जंगी स्वागत

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूरच्या दोऱ्यावर आहेत. दरम्यान यादौऱ्यावेळी त्यांचं कागल येथे जंगी स्वागत करण्यात आलं. कर्यकर्त्यांनी जेसीबीने फुले उधळून त्यांचं स्वागत केलं.

दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रिट्रीट सोहळा सुरू 

दिल्ली येथील विजय चौकात बीटिंग रिट्रीट सोहळा सुरू झाला आहे.

छगन भुजबळ कधीच सरकारमधून बाहेर पडणार नाहीत- जितेंद्र आव्हाड

मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर छगन भुजबळ यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. यावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले,' भुजबळ कधीच सरकारच्या बाहेर पडणार नाहीत. फक्त दोन कोंबडे झुंजवत ठेवायची सुपारी या दोघांनी घेतली आहे'.

रोहित पवारांकडून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा गुन्हा

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात आमदार रोहित पवार यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. पुणे न्यायालयात १०० कोटींचा दावा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी खोटे आरोप केले होते व चुकीचे वक्तव्य केले होते. ईडीच्या चौकशीनंतर कोणी खोटे किंवा चुकीचे आरोप केले तर कायदेशीर कारवाई करण्याचा रोहित पवार यांनी इशारा दिला होता.

उध्दव ठाकरेंचं माझ्यावरचं प्रेम जगजाहीर; त्यांच्या शुभेच्छांबद्दल आभार- राहुल नार्वेकर

उध्दव ठाकरेंचं माझ्यावरचं प्रेम जगजाहीर आहे. त्यांच्या शुभेच्छांबद्दल आभार. माझ्यावर वैयक्तीक टीका करण्यापेक्षा कामावर बोला असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर; महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश

राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे. देशभरातील १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज (सोमवारी) अधिसूचना जारी केली आहे.

मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या- छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की मराठ्यांचा ओबीसीत घुसवणं बंद करा, त्यांना वेगळं आरक्षण द्या , असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

भारतीय नौसेनेने वाचवले इराणी मच्छिमाराचे प्राण

भारतीय नौसेनेच्या INS Sumitra या अँटी पायरसी नौकेने इराणी मच्छीमाराचा जीव वाचवला आहे. इराणी मच्छीमाराची बोट सोमालियन पायरेट्सकडून हायजॅक करण्यात आली होती.

धाराशीव लोकसभा विधानसभा मतदार संघाचं नाव उस्मानाबादच, निवडणूक आयोगाचे आदेश

धाराशीव लोकसभा आणि विधानसभा मतदार संघाचं नाव हे उस्मानाबादच असणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत.

Prakash Ambedkar:प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, भाजपने १२० जागा केल्या होत्या ऑफर

Prakash Ambedkar on BJP: प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक विधान केलं आहे. भाजपकडून त्यांना १२० जागांची ऑफर देण्यात आली होती, असा खुलासा आंबेडकर यांनी केला.

Narayan Rane: नारायण राणेंची पत्रकार परिषद रद्द

Narayan Rane PC: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर होणार नारायण राणे यांची पत्रकार परिषद काही कारणामुळे रद्द करण्यात आली आहे.

Ajit Pawar at Kolhapur: गंगावेस तालमीला अजित पवारांनी दिली भेट, क्रीडा अधिकाऱ्यांची केली कानउघडणी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील प्रसिद्ध गंगावेस तालमीला भेट दिली. यावेळी त्यांनी पाहणी करुन क्रीडा अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना! नवऱ्यासोबत भांडणानंतर बायकोने लावली आग

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नवरा-बायकोमध्ये छोट्याश्या कारणावरुन वाद झाला. त्यानंतर बायकोला राग अनावर झाला आणि रागात बायकोने संपूर्ण घराला आग लावली. यामुळे घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं.

ग्रीन हायड्रोजन, ग्रीन एनर्जी क्षेत्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींचे करार 

राज्यात ग्रीन हायड्रोजन, ग्रीन एनर्जी क्षेत्रात जंबो गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हे करार पार पडले आहेत. तब्बल २ लाख ७६ हजार ३०० कोटींचे हे करार आहेत. यातून ६० हजार लोकांना रोजगार मिळणार आहेत.

सरकारमधून, पक्षातून बाहेर काढावं पण लढत राहणार - छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणावरुन छगन भुजबळ आता अधिकच आक्रमक झाले आहेत. मला सरकारमधून, पक्षातून बाहेर काढावं पण आपण लढत राहणारच, असं भुजबळांनी म्हटलं आहे. साम टिव्हीशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

न्यूजक्लीकच्या संस्थापक संपादकाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ 

हिंमत असेल तर केंद्रीय मंत्री असेपर्यंत बारसूत येऊन दाखवा - विनायक राऊत

कोकणात रिफायनरी प्रकल्प आणणारच अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मांडली आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी त्यांना थेट आव्हान दिलं. हिंमत असेल तर केंद्रीय मंत्री असेपर्यंत बारसूत येऊन दाखवा, असा इशाराच यावेळी राऊत यांनी दिला.

चंद्राबाबू नायडूंना मोठा दिलासा;आंध्रच्या सरकारची याचिका फेटाळली

Rahuri Murder Case:वकील दांपत्य हत्येप्रकरणी आरोपींना दहा दिवसांची कोठडी

वकील दांपत्याच्या हत्याकांडप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना राहुरी न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली  विद्यार्थ्यांशी चर्चा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रीय राजधानीत त्यांच्या 7 व्या 'परीक्षा पे चर्चा' संबोधनापूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसले PM मोदी सकाळी 11 वाजता 'परीक्षा पे चर्चा' वर 'परीक्षा योद्धा' च्या मेळाव्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

OBC यात्रेसाठी कमिटी नेमली आहे; छगन भुजबळांची माहीती

OBC यात्रेसाठी कमिटी नेमली आहे अशी माहिती मंत्री छगन भुजबळांची दिली. याच बरोबर मी एकटा नाही माझ्या सोबत करोडो लाेक आहेत असेही ते म्हणाले

Bhiwandi News: भिवंडीत बनावट जिऱ्याचा कारखाना पोलिसांनी केला सील

नंडोरे येथे बनावट जिरेनिर्मिती कारखाना पोलिसांनी शनिवारी सील केला. या ठिकाणी रसायने वापरून जिऱ्याची निर्मिती केली जात होती. या बनावट जिऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे समोर आले असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Mumbai News : अटल सेतूने 10 दिवसांत वसुल केला 6 कोटींचा टोल 

अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईचा प्रवास फक्त 15 ते 20 मिनिटांवर आला आहे. या सेतुचे लोकार्पण १२ जानेवारी रोजी झाले. गेल्या10 दिवसांत 3 लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. ज्यामधुन 6 कोटी रुपये टोल वसुली झाली आहे.

Nitish Kumar: बिहारमध्ये नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक आज अकरा वाजता

बिहारमध्ये जेडीयू- भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक आज सकाळी अकरा वाजता होणार आहे.

Raj Thackeray: राज ठाकरे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये; ४ दिवस तळ ठोकणार

मनसे प्रमुख राज ठाकरे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आहेत. ते चार दिवस नाशिकमध्ये तळ ठोकणार असल्याची माहिती मिळत आहे.

Manoj Jarange Patil: नव्या कायद्यानुसार पहिलं सर्टिफिकेट मिळाल्यास विजयी सभा घेणार- जरांगे पाटील

शिवाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील आज रायगड किल्ल्याकडे निघाले आहेत. यावेळी ते म्हणाले की, नव्या कायद्यानुसार पहिलं सर्टिफिकेट मिळालं ती विजयी सभा घेणार आहे.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी ११ फेब्रुवारीला यवतमाळच्या दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी ११ फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. किन्ही येथे त्यांची सभा होणार असल्याची माहिती सामच्या सूत्रांनी दिली आहे.

Congress Meeting in Latur: काँग्रेसच्या बड्या नेत्यांची आज लातूरमध्ये बैठक

काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बैठक लातूर येथे आज पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक मानली जात आहे. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख इत्यादी नेते बैठकीला उपस्थित राहतील.

Ravidra waikar: रविंद्र वायकर यांची आज ईडीकडून पुन्हा चौकशी

रविंद्र वायकर यांची आज पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी केली जाणार आहे. जोशेश्वरी बीएमसी प्लॉट आणि फाईस्ट स्टार हॉटेलप्रकरणी ईडी त्यांची चौकशी करत आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढत असल्याचं दिसतंय.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील आज रायगड किल्ल्यावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घेणार

मनोज जरांगे पाटील आज रायगड किल्ल्यावर जाणार आहेत. याठिकाणी ते शिवाजी महाराजांचे दर्शन घेतील. मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना निघाली आहे. मराठ्यांचा विजय झाला असल्याने ते महाराजांच्या चरणी जाणार आहेत.

ओबीसी-मराठा समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी एल्गार मेळाव्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या काळात ओबीसींच्या सभा होतील. दुसरीकडे,मनोज जरांगे पाटील आज रायगड येथे जाऊन शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहे. आज ईडी रविंद्र वायकर यांची चौकशी करणार आहेत. अशाच प्रकारच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला इथे वाचायला मिळतील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com