Archana Patil Chakurkar: चाकूरकरांची भाजप एन्ट्री लातूरमधलं काँग्रेसचं वारं कसं थोपवणार?

Archana Patil Chakurkar: लोकसभेची तयारी सुरु असतानाच पक्षांतरांचा धडाका सध्या मोठ्या प्रमाणावर सुरु झाला आहे. लोकसभेच्या उमेदवारीवरून, किंवा स्थानिक पातळीवरील राजकारणाला कंटाळून, पक्षानं संधी दिली नाही अशा ह्या ना त्या कारणाने नेतेमंडळी पक्षांतर करत आहेत.
Latur Former Home Minister Shivraj Patil Chakurkar Daughter In Law Dr Archana Patil Joined Bjp
Latur Former Home Minister Shivraj Patil Chakurkar Daughter In Law Dr Archana Patil Joined BjpSakal

Archana Patil Chakurkar: लोकसभेची तयारी सुरु असतानाच पक्षांतरांचा धडाका सध्या मोठ्या प्रमाणावर सुरु झाला आहे. लोकसभेच्या उमेदवारीवरून, किंवा स्थानिक पातळीवरील राजकारणाला कंटाळून, पक्षानं संधी दिली नाही अशा ह्या ना त्या कारणाने नेतेमंडळी पक्षांतर करत आहेत.

यात खासकरून काँग्रेसच्या नेत्यांच प्रमाण जास्त असल्याचं पहायला मिळतय गेल्या काही दिवसात काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. या सगळ्यात आता निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अशोक चव्हाणांनंतर चाकूरकर यांच्या भाजपप्रवेशामुळे मराठवाड्यातील राजकीय गणित कशी बदलणार ते जाणून घेऊ?

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा विलासराव देखमुखांच्या घराण्याचा उल्लेख आवर्जून होतो. सध्या विलासरावांची दोन्ही मुलं अमित देशमुख आणि धीरज देशमुख आमदार आहेत. पण यासोबतच जेव्हा एकूण लोकसभा मतदारसंघाविषयीचा मुद्दा येतो. तेव्हा चाकूरकर घराण्याचं नाव समोर येतं.

काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर या मतदारसंघातून ७ वेळा खासदार राहिलेत. एकूण काय देशमुख घराणं आणि चाकूरकरांमुळे लातुरमध्ये काँग्रेसचा चांगलाच जम होता. पण २००४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपच्या रुपाताई निलंगेकरांनी चाकूरकरांचा पराभव केला. त्यानंतर २००९ ला जयंत आवलेंनी पुन्हा काँग्रेसच्या तिकीटावर खासदारकी मारली. पण २०१४ च्या मोटी लाटेत हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या हातून निसटला. २०१४ ला भाजपचे सुनील गायकवाड आणि २०१९ ला सुधाकर श्रींगारे खासदार झाले.

आता लातूर मधलं राजकीय गणित कसं आहे ते समजावून घेऊ.

लातूरमध्ये लोहा, लातूर ग्रमाीण, लातूर शहर, अहमदपुर, उदगीर आणि निलंगा अशा ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातल्या लातूर ग्रमाीण, लातूर शहर हे मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहेत. अहमदपुरमध्ये पवार गटाचे बाळासाहेब पाटील, उदगीरमध्ये अजित पवार गटाचे संजय बनसोडे, निलंगामध्ये भाजपचे संभाजी निलंगेकर तर लोहामध्ये PWP चे श्यामसुंदर शिंदे आमदार आहेत.

आणि यंदाच्या लोकसभेला कांग्रेसने शिवाजी कळगे यांनी उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून विजयाची हॅट्रिट करण्यासाठी पुन्हा एकदा सुधाकर श्रृंगारे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे कळगे विरुद्ध श्रृंगारे असा थेट सामना इथे होणार आहे.

लातूरमध्ये जातीय समीकरण मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतं. या भागात लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे. आणि चाकूरकरांना लिंगायत समाजाचा मोठा पाठिंबा राहिला आहे. आजही त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे.

पण याच भागात मराठा समाजाचा एक वेगळा गटही पहायला मिळतो जो देशमुखांच्या बाजुने आहे. म्हणजे असं म्हंटलं जात की, देशमुख आणि चाकूरकर दोघेही काँग्रेसमधले बडे नेते पण त्यांच्यात अंतर्गत राजकीय वादही होते.

म्हणजे १९९९ ला जेव्हा विलासरावांचा पराभव झाला होता. तेव्हा लिंगायत समाजाने त्यांना पाडलं होत असं बोललं जात. तर २००४ ला जेव्हा शिवराज चाकूरकरांचा लोकसभा निवडणूकीत पराभव झाला तेव्हा मराठा मतदान फिरल्याचं बोललं जातं. हा अंतर्गत विरोध जरी असला आणि २००४ ला पराभव जरी झाला तरी काँग्रेसने शिवराज पाटलांना केंद्रात पाठवलं 2004 ते 2008 मध्ये ते मनमोहन सिंग मंत्रीमंडळामध्ये गृहमंत्रीपदावर होते.

Latur Former Home Minister Shivraj Patil Chakurkar Daughter In Law Dr Archana Patil Joined Bjp
Sanjay Raut : ‘त्यांच्या’ मागे आंबेडकर उभे राहणार नाहीत : राऊत

शिवराज चाकूरकर हे कांग्रेसचे एकनिष्ठ नेत्यांपैकी होते. इंदिरा गांधींपासून राजीव गांधी यांचेही चाकूरकरांसोबत जवळचे संबंध होते. दरम्यान २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयश आल्याच्या टीकेवरून पाटीलांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कांग्रेसने त्यांना २०१० ते २०१५ दरम्यान पंजाब राज्याचे राज्यपाल पदाची जबाबदारी दिली.

पण त्यानंतर शिवराज पाटील चाकूरकरांनी राजकारणातून संन्यास घेतला. पण त्यानंतर त्यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर राजकारणात उतरल्या. चाकूरकरांचा मुलगा शैलेश पाटील हे सुद्धा राजकारणात आहेत. ते सध्या काँग्रेसच्या शहर प्रदेश कार्यकारणीवर आहेत.

पण प्रत्यक्ष निवडणूकीत त्यांचा सहभाग तसा नाही. पण अर्चना चाकूरकर या निवडणूकीत सध्या सक्रिय झाल्यात. २०१९ ला सुद्धा अर्चना चाकूरकांना काँग्रेसच्या तिकीटवार लातूर शहरमधून विधानसभा लढवणार अशी चर्चा होती. पण कौटुंबिक कारणामुळे त्यांनी माघार घेतली आणि त्या ठिकाणी धीरज देशमुखांना संधी देण्यात आली.

Latur Former Home Minister Shivraj Patil Chakurkar Daughter In Law Dr Archana Patil Joined Bjp
Ram Satpute: सत्तेच्या काळात सोलापूरातील 12 अतिरेकी विरोधकांनी सोडले; राम सातपुतेंचा आरोप

पण आता अर्चना पाटलांनी वेगळा मार्ग निवडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपप्रवेशामुळे लातूरमधील लिंगायत मतदारांचा मोठा फायदा भाजपला होऊ शकतो. कारण यंदाच्या लोकसभेला काँग्रेसने शिवाजी कळगे यांच्या रुपाने लिंगायत समजातील SC कॅटेगरीतला चेहरा मैदानात उतरवला. कारण २००९ पासुन लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे देशमुखांच्या मराठा मतांचा आणि लिंगायत मतांचा फायदा होईल, सोबत दलित मतही वळवता येतील.

पण आता भाजपने मोठी खेळी खेळत चाकूरकरांनाच आपल्याकडे घेतले आणि भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही अर्चना चाकूरकरांना लातूर शहरमधून अमित देशमुखांच्या विरोधात भाजप उतरवू शकतं. अशी चर्चा आहे. किंवा विधानपरिषदेवर पाठवू शकतं. त्यात अर्चना चाकूरकरांसोबत उदगीरचे 7 वेळा नगराध्यक्ष असलेले राजेश नितुरे यांनी देखीव भाजपामध्ये प्रवेश केला. नितुरे सुद्धा लिंगायत समाजाचा चेहरा आहेत, त्यामुळे एकूणच अर्चना चाकूरकरांचा प्रवेश भाजपला फायद्याचा ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com